ताज्या घडामोडी

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष अंकुश काळे पाटील यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष अंकुश काळे पाटील यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 02/06/2024 :
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे नवनिर्वाचित प्रदेश युवक अध्यक्ष अंकुश भास्करराव काळे पाटील यांचा नवनियुक्ती बद्दल सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. साखर संकुल शिवाजीनगर येथील नियोजित बैठकीनंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार, यांचे उपस्थित संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्यास संघटनेचे युवक सदस्य सुनील अवचिते, मारुती जाधव यांचे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

“शेतकऱ्यांसाठी स्व. शरद जोशीं नावाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना राष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे.विठ्ठल पवार हे अत्यंत कणखर व शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणारे कार्यकर्ते आहेत. गेली तीन दशकाहून अधिक काळ शरद जोशींच्या नेतृत्वाखाली ते कार्यरत आहेत. ते राज्य सरकारकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. आपण देखील नवनियुक्तीच्यानंतर शेतकऱ्यांसाठी, युवक, कामगारांसाठी चांगले काम कराल.” अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनियुक्त युवक अध्यक्ष अंकुश काळे यांना दिल्या. वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन सल्लागार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नॅशनल युनियन बॅकवर्ड क्लासेस एससी एसटी अँड मायनॉरिटीज अर्थात राष्ट्रीय  पिछडा  आयोग दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनीही राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांचे माध्यमातून काळे पाटील यांचे अभिनंदन केले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.