ताज्या घडामोडी

गलांडेवाडी मित्र मंडळा तर्फे अल्पोपहार आणि जारचे पाणी वाटप

गलांडेवाडी मित्र मंडळा तर्फे अल्पोपहार आणि जारचे पाणी वाटप

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 01/06/2024 :
गलांडेवाडी मित्र मंडळ (तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर) यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. गलांडेवाडी बस स्थानका समोर उभारण्यात

आलेल्या भव्य स्टेज आणि सभामंडपात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चौंडी कडे जा – ये करणाऱ्या सर्वांसाठी जयंतीनिमित्त अल्पोपहार आणि जार चे स्वच्छ पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. WDSO अर्थात वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव आटोळे, सल्लागार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि एन.यू.बी.सी. अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रदेश प्रसिद्धीप्रमुख पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शनाचा लाभ घेऊन यथायोग्य मार्गदर्शन केले.

गलांडेवाडी मित्र मंडळाचे अध्यक्ष माऊली हनुमंत गलांडे आणि त्यांचे सहकारी अमोल कल्याण गलांडे, राहुल संजय उघडे, संग्राम देविदास गलांडे, अमोल अंकुश गलांडे इत्यादी मान्यवरांनी बबनराव आटोळे आणि भाग्यवंत नायकुडे यांचा कार्यक्रम स्थळी उचित सन्मान केला. गलांडवाडी मित्र मंडळाचे हे दुसरे वर्ष असून मंडळाच्या वतीने समाज हितोपयोगी विविध उपक्रम नेहमीच राबविले जात असल्याची माहिती याप्रसंगी मंडळाचे अध्यक्षांनी सांगितली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.