ताज्या घडामोडी

खटाखट पटापट अन् राहुलबाबा सटासट

खटाखट पटापट अन् राहुलबाबा सटासट

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

दिनांक 31/05/2024 :
काय झालं उतावळा ‘ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग ‘ अशी परिस्थिती इंडिया आघाडीची झाली आहे कारण या आघाडीतील नेत्यांना खुर्चीवर बसण्याचा इतका मोह झाला आहे. पण देशातील एकशे चाळीस कोटी लोकांनी त्यांच्या या खुर्चीवर कवसकुली लावली आहे त्यामुळे पप्पूला सतत खाजवत मग ती खाज खाजवायला दीडशे किलोमीटर पळणारा तितकाच खर्जूला नामधारी अध्यक्ष नेमून काॅंग्रेसने देशातील स्वतःची औकात सिध्द केली आहे त्यामुळे येत्या चार जूनला इंडिया नामक आघाडीला दुर्बिणीतून अवकाश परिभ्रमण करीत शोधाव लागेल असो या महाभिकास आघाडीला काही तास तरी स्वप्नात न्हाहून घ्यायला कुणाची हरकत आहे नाही का ॽ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उठता बसता अतीशय खालच्या भाषेत टीका केली याचा अर्थ इंडिया नामक आघाडीचा वारु सत्तेच्या चाव्या घेऊन देशाचा कारभार चालवतील असा होत नाही पण काय या गोष्टी पप्पूला कोण सांगणार ! वास्तविक काॅंग्रेस प्रणित आघाडीची दहा वर्षापूर्वी सत्ता होती मग ती सत्ता का गेली याचा विचार हे लोक का करत नाही वास्तविक या काळात या सत्ताधाऱ्यांचा इतका हैदोस पराकोटीचा होता की यांनी जवळपास बारा लाख कोटी रुपयांची अक्षरशः या ना त्या मार्गाने लूट केली त्यामुळे यांना जनतेने त्यांच्या बकोटीला धरुन फरफटत हाकलून लावले. याच काळात अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांनी देशव्यापी आंदोलन छेडले पण यांची दिल्लीत जाऊन सत्ता काबीज करण्यासाठीची लागणारी कुवत नव्हती याचा फायदा भाजपला झाला म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा केंद्रीय राजकारणात उदय झाला मग त्यांनी जनतेची नस ओळखून कारभार केला पण त्यांचे नोटा बंदी , जी.एस.टी.सारखे काही निर्णय आजही लोकांच्या पचनी पडत नाही कारण त्यामुळे अनेक उद्योजकांची जशी राखरांगोळी झाली तशीच लाखो कर्मचारी देशोधडीला लागले हे तितकेच वास्तव आहे पण याचा फायदा काॅंग्रेस आघाडीला नक्कीच घेता आला असता पण पप्पूने टिवल्याबावल्या करत ही हाती येत असलेली नामी संधी धुडकावून लावली .
आता ही संधी पुन्हा कधी येईल याची काही केल्या खात्री नाही कारण यांच्याकडे त्या तोडीचा खमक्या नेता नाही म्हणून यांनी यावेळी प्रचारातील सभ्यता पायदळी तुडवली त्यामुळे मतदार यांना येत्या चार जूनला पायदळी तुडवत त्यांचा चक्काचूर करणार आहेत. यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले याचा अर्थ असा नाही की त्यांना सत्ता मिळेल. कारण सत्ता म्हणजे यांना भाजी मंडईत मिळणारी कोथिंबीरीची पेंडी वाटली का ॽ आता मोदी कालपासून स्वामी विवेकानंद यांच्या चरणी लीन होण्यासाठी कन्याकुमारीला गेले आहेत त्याच दरम्यान ते काही तास ध्यानस्थ होणार आहेत याचीही पोटदुखी इंडिया नामक आघाडीच्या नेत्यांना झाली आहे ही यांची लोकशाही कारण हेच लोक संविधान वाचवण्याच्या सातत्याने वल्गना करत असतात याचा अर्थ यांच्या पोटात एक आणि ओठात भलतंच काहीतरी असत , आता ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळतील त्यावेळी या आघाडीतील अनेक नेते तुरुंगवारीवर असतील हे तितकेच खरे आहे.

राजाभाऊ त्रिगुणे ,
सातारा .पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे. मुंबई

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.