अकलूज येथे “लाल परी” अर्थात एस टी चा ७६ वा वर्धापन दिन साजरा.

अकलूज येथे “लाल परी” अर्थात एस.टी.चा ७६ वा.वर्धापन दिन साजरा.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/06/2024 :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ शाखा अकलूज च्या वतीने “लाल परी” अर्थात एस.टी.चा ७६ वा वर्धापनदिन अकलूज बस स्थानकामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. लाल परी च्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापून मिठाई सह सर्व प्रवाशांना वाटप करण्यात आले.
(सर्व फोटो संजय लोहकरे आणि केदार लोहकरे अकलूज)
यावेळी प्रमुख पाहुणे आगाराचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वास कदम, आगार प्रमुख प्रमोद शिंदे, नाना जवंजाळ, रामहरी नवगिरे सहाय्यक अधीक्षक अनिरुद्ध सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक केतन सोनवणकर, वाहतूक नियंत्रक कांतीलाल मदने, संजय पिसे, विजय रंधवे, महेश कुलकर्णी, यांचेसह एस.टी. अकलूज आगाराचे वाहक, चालक, सेवक, कर्मचारी, प्रवासी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविकात आगार प्रमुख प्रमोद शिंदे म्हणाले एक जून 1948 ला पुणे अहमदनगर मार्गावर एसटी ची पहिली बस धावली म्हणून एक जून हा एसटीचा वर्धापन दिन साजरा केला जातो. राज्यात केवळ 36 बेड फोल्ड बसेस वर सुरू झालेला हा प्रवास 76 वर्षात 15000 बसेस पर्यंत पोहोचला आहे. राज्यातल्या 560 पेक्षा जास्त बस स्थानकावरून दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. एसटी बससाठी 75 वर्षावरील जेष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार अशा 30 पेक्षा जास्त समाज घटकांना एसटी प्रवासी सेवेमध्ये 33% पासून 100% पर्यंत शासनाने सवलत दिली आहे. याचबरोबर विविध सण, उत्सव, वारी यासाठीही ज्यादा फेऱ्या देऊन बस प्रवाशांची सोय करते. प्रवाशांचे प्रेम आणि विश्वासार्हता या शिदोरीवरच एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे असे डॉ. माधव कुसेकर यांनी दिलेल्या शुभेच्छा पत्रांचे त्यांनी वाचन करून दाखवले.यावेळी एन. यू.बी.सी. अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रदेश प्रसिद्धीप्रमुख व ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
चंद्रकांत कुंभार, भारत मगर, यांनीही आपले मनोगता द्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या.
तर सेवानिवृत्त झालेले प्रकाश ननवरे, मनोज इनामके, संजय कुलथे, अशोक ठवरे, राजाराम पाटील यांचाही सत्कार ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला.