ताज्या घडामोडी

“रमाई स्मृतिदिनानिमित्त बेरोजगार मुक्त भारत करण्याचे प्रथम एज्युकेशनचं उद्दिष्ट” : सुधाकर भदरगे

“रमाई स्मृतिदिनानिमित्त बेरोजगार मुक्त भारत करण्याचे
प्रथम एज्युकेशनचं उद्दिष्ट” : सुधाकर भदरगे

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 01/06/2024 :
“रमाई स्मृतिदिनानिमित्त बेरोजगार मुक्त भारत करण्याचे प्रथम एज्युकेशनचं उद्दिष्ट आहे” असे मत प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे राज्य समन्वयक सुधाकर भदरगे यांनी व्यक्त केले. वाणी चिंचाळे (ता. सांगोला जिल्हा सोलापूर )येथे रमाई स्मृती दिनानिमित्त प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या फूड अँड ब्रेवरीज हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे तालुका संघटक, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, अस्तित्व सामाजिक संघटनेचे शहाजी गडहिरे, माजी सरपंच चिदानंद स्वामी, विद्यमान सरपंच गडहिरे, ऍड. सोमनाथ ऐवळे, विकास घडहिरे, पत्रकार सचिन गडहिरे, मुख्याध्यापक, शिक्षक, युवक नेते जितेंद्र गडहिरे, समाजसेविका सुशीला खरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्य समन्वयक सुधाकर भदरगे पुढे बोलताना म्हणाले, देशभरात एका वर्षात कम्युनिटी बेस 30000 तर सेंटरच्या माध्यमातून 30000 असे 60 हजार प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्माण करणार अशी घोषणाच करण्यात आली आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा उद्देशच आहे त्याकरिता गावागावातून अनेक प्रतिष्ठित व विविध संघटना पक्ष नेते पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय अपुरी आहे त्यातल्या त्यात रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करणारी कौशल्यही निर्माण करण्यावर भर देणारी संस्था असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. नाममात्र अर्थात मोफत प्रशिक्षण देऊन कौशल्यावर आधारित समृद्ध देश घडवणे हाही उद्देश सफल होत आहे. माजी नगरसेवक किशोर बनसोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मानव कल्याण साधना करता आणि आपल्या विकासाकरता आपल्या दारी आलेला आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपण आपलं जीवन संसार सुखी समाधानी व्हावं आणि सर्वांना देखील समाधानी करावं. जलप्रपात भारतात पाण्याचा मोठा लोंढा हा माणसाला बुडवण्यासाठी नाही तर त्याला पोहायला शिकवण्यासाठी येत असतो अशी भूमिका घेऊन आपलं ज्ञान आत्मसात करा आणि आयुष्य मंगलमय करा अशी भूमिका देखील या निमित्ताने मांडण्यात आली. शहाजी गडहिरे यांनी समारोप केला

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.