श्री दत्त जन्मोत्सव सोहळा
श्री दत्त जन्मोत्सव सोहळा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 30/11/2025 :
श्रीपाद सेवा मंडळ दत्त मंदिर लोणकर वस्ती, संग्रामनगर अकलूज (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) यांच्यावतीने दत्त मंदिरात गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत श्रीं ना अभिषेक व आरती, सकाळी सात वाजता तीर्थप्रसाद. सकाळी 7:45 ते 11:45 श्रीमत गुरुचरित्र सामुदायिक पारायण, दुपारी 4 ते 6 श्रीराम गुरुकुल भजनी मंडळ दत्त मंदिर लोणकर वस्ती संग्रामनगर अकलूज यांचे भजन व अभंग,
सायंकाळी 6 वाजता जन्मोत्सवानिमित्त पुष्पवृष्टी व दर्शन, त्यानंतर 6:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत महाप्रसाद. यानुसार धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीपाद सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
