कृतघ्नतेचा कळस…..❗
"मानवी गुण व अवगुण याचा विचार करताना कृतज्ञता हा पराकोटीचा सद्गुण आहे व कृतघ्नता हा नीचतम श्रेणीतील अवगुण आहे"
प्रासंगिक लेख…….✍️
कृतघ्नतेचा कळस…..❗
“मानवी गुण व अवगुण याचा विचार करताना कृतज्ञता हा पराकोटीचा सद्गुण आहे व कृतघ्नता हा नीचतम श्रेणीतील अवगुण आहे”
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64.
आज 25 मे 2024
मी 21 मे 24 रोजी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया मीडियाचे सर्व चैनल व आपल्या देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस व त्यांचे नेते याबद्दल बारकाईने पाहिले 21 मे या दिवसाचे काय महत्त्व होते बरं?
आपल्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान माननीय राजीव गांधी यांची 21 मे 91 रोजी मानवी बॉम्ब च्या साह्ययाने हत्या झाली होती. 21 मे 24 रोजी राजीव गांधी यांची पुण्यतिथी होती. पण त्या दिवशी ज्यांनी आज पर्यंत राजीव गांधींच्या नावाने कंठ शोष करून आपल्या अनेक पिढ्यांची तरतूद करून ठेवली आहे ते काँग्रेसचे नेते कार्यकर्ते हे सर्वजण राजीव गांधी यांना विसरल्याचे दिसले. कोणत्याही काँग्रेस कमिटी मध्ये राजीव गांधींची पुण्यतिथी साजरी झाली असेल असे मला वाटत नाही.
हो अपवादानेच नियम सिद्ध करण्यासाठी गांधी कुटुंबीय कुळाचार पाळण्यासाठी 21 मे ला सकाळी समाधीवर नमस्कार करून आले.
1984 च्या वेळी 400 खासदार राजीव गांधींच्या नेतृत्वाने या देशात निवडून आले होते. आज भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे 84 चे रेकॉर्ड मोडण्याच्या विचारात आहे व तशी हवा पण निर्माण झाली आहे.स्व.
राजीव गांधींची आठवण काँग्रेसवाल्यांना येत नसेल पण आज
भाजपवाले मात्र 84 चे रेकॉर्ड तोडण्याच्या भाषेत या ना त्या प्रकारे राजीव गांधी यांची देशाला व समाजाला आठवण करून देत आहेत.
“भूतकाळ विसराल तर भविष्यकाळ गमवाल”
हे मला मान्य आहे आज काँग्रेसची संघटनात्मक बांधणी कमकुवत व कार्यकर्त्यांची कमतरता ही दिसून येत आहे. पण आपल्या, आपल्या स्वतःचे कुटुंबीयांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरी करणारे हे काँग्रेसचे कार्यकर्ते थोड्या प्रमाणात तरी त्यांनी राजीवजींची पुण्यतिथी साजरी करण्यास काय हरकत होती?
पण जे सत्ता गेल्यामुळे हताश झालेले आहेत त्यांना आपला मागील सुवर्णमयी भूतकाळ आपण विसरत
आहोत याची जाणीवही राहीली नाही.
त्यांना आपला पक्ष आपले नेते त्याचे कर्तृत्व याचा विसर पडला आहे
“आड आणी पोहरा”
काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाबद्दल बोलणेच अवघड आहे. देशभर ठरवून राजीव गांधींची पुण्यतिथी साजरी करण्या काँग्रेस पक्षाला काय अवघड होते. भले अशा कार्यक्रमाला कदाचित फार प्रतिसाद मिळाला नसता पण कृतज्ञता व्यक्त करताना प्रतिसादाची अपेक्षा करणे योग्य नाही. जिधे काँग्रेसच राजीव गांधींना विसरला आहे तर बाकीचे त्यांचे मित्र पक्ष काय करणार “जिथे आडातच नाही तिथे पोहऱ्यात काय येणार” ?
एक संयमी ,हुषार, उमद ,यशस्वी नेतृत्व तामिळी बंडखोरांच्या बाबतीत घेतल्या गेलेल्या चुकीच्या निर्णयामुळे बळी पडले. त्यांच्या हौतात्म्याची जाहिरात करत मत मागणाऱ्या काँग्रेसचे नेतृत्वाला राजीव गांधी यांचा विसर पडलेला आहे हे नक्की.
मी ही पोस्ट 21 मे रोजी पाठवणार होतो. सोशल मीडियावर तरी कोणी काँग्रेसजन आठवण म्हणून बिन खर्चाची पोस्ट टाकतील व ती वाचावयास मिळेल अशी माझी अपेक्षा होती पण तेही घडले नाही.
म्हणून या लेखाचे शीर्षक मी “कृतघ्नतेचा कळस” असे टाकले आहे. मी राजीव गांधी यांच्या विचारसरणीपासून अलग विचाराचा आहे. पण आपल्या देशाचे नेतृत्व केलेल्या या माजी पंतप्रधानाना माझी उशिरा का होईना भावपूर्ण श्रद्धांजली. कारण मी भिन्न विचारसरणीचा असलो तरी कृतघ्न नाही.
ॲड अनिल रुईकर
98 232 55 0 49
इचलकरंजी
🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.