वादळी वाऱ्या, पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत : शिवराम गायकवाड 🟩स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

वादळी वाऱ्या, पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत : शिवराम गायकवाड
🟩स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 24/05/2024 :
वादळी वाऱ्यामुळे व वादळी पाऊसामुळे माढा लोकसभा मतदार संघातील नुकसान झालेल्या पिकांचे,घरांच्या नुकसानीचे व वाकलेल्या – फुटलेल्या महावितरण खांबांचे पंचनामे तात्काळ करावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवराम गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
माढा लोकसभा मतदार संघातील समाविष्ट तालुक्यापैकी माढा,माळशिरस,करमाळा,सांगोला,पंढरपूर,फलटण, माण- खटाव या तालुक्यांसह माळशिरस, माढा, पंढरपूर तालुक्यात सलग तीन – चार दिवसापासून वादळी वाऱ्यासह कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. वेगवान वाऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सर्व गावांसह बोरगाव, माळेवाडी(बो), माळखांबी,जांभूड, खळवे, खंडाळी, महाळूंग, नेवरे,उंबरे (वे), कोंढारपट्टा, तोंडले -बोंडले, संग्रामनगर, अकलूज, माळेवाडी (अ),यशवंतनगर,माळीनगर,लवंग, वाघोली, वाफेगांव, गणेशगांव, संगम, बाभुळगांव यांसारख्या अनेक गावांमध्ये आंबा,केळी,नारळ, पेरू, द्राक्षे, सीताफळ,डाळिंब,ड्रॅगन फूड या फळबागांसह झेंडू,गुलाब,शेवंती आदी फुलबागांचे व ऊसाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महसूल,कृषी अधिकारी, महावितरण व संबधित प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांनी पंचनामा अहवाल तयार तात्काळ करण्यात यावेत. त्याचबरोबर माढा लोकसभा मतदार संघातील माळशिरस तालुक्यातील काही गावांमध्ये काही कुटुंबांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले असून,घरांची पडझड, जनावरांचा गोठा,चारा पिके भुईसपाट झाली आहेत व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे चारा उडाला आहे. त्यामुळे चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी वादळी पाऊस व वारे यांमुळे मोठ्या संख्येने शेतातील महावितरण खांब,मोठमोठाली झाडे,फळबागाही मोडून पडली आहेत.
सदर ठिकाणी संबधित प्रशासन अधिकारी,कर्मचारी यांनी तेथील स्पॉट पंचनामा अहवाल तात्काळ तयार करून संबधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १,००,००० लाख रुपये आणि घरांची पडझड,पत्रे उडालेल्या प्रती कुटुंबांना ५०,००० हजार रुपयांपर्यंत शासकीय आर्थिक मदत जाहीर करावी आणि संबंधित नुकसानग्रस्त कुटुंबांचे घरांची दुरुस्ती करावी अश्या आशयाचे निवेदन प्रांत कार्यालय अकलूज यांच्याकडे देण्यात आले त्यावेळी चंदनशिवे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवराम गायकवाड, दत्तात्रय गोरे,आकाश पराडे,रणजितसिंह कदम,मधुकर जाधव, धन्यकुमार चव्हाण,तुषार केंगार,सचिन चव्हाण,हर्षवर्धन घळके,सिराज तांबोळी,आदी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.