माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 28 डिसेंबर 2024 :
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना माळशिरस तालुका काँग्रेस (आय) कमिटी च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शासकीय विश्राम गृह माळशिरस येथे आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभाग प्रदेश सचिव गिरीश प्रभाकर शेटे, राजीव गांधी पंचायत राज संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अंकुश नामदास, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर, तालुका कार्याध्यक्ष दादा मार्तंड पाटील, ग्राहक मंचचे सुहास अण्णासो सिद, रामचंद्र बापूराव पाटील, शंकर श्रीरंग वाघमोडे, धोंडीबा कृष्णा रणदिवे, रमेश शिवाजी शिंदे, युवक नेते धाईंजे, इकबाल काझी, विजय लक्ष्मण मोरे, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन.यू.बी.सी. चे महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धी प्रमुख सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.