ताज्या घडामोडी

माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ताई सचिन वावरे यांची बिनविरोध निवड

माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ताई सचिन वावरे यांची बिनविरोध निवड

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

माळशिरस प्रतिनिधी दिनांक 08/05/2024 :
माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ताई सचिन वावरे यांची आज बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष पद रिक्त झाल्याने नगर अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली होती. या पदासाठी ताई सचिन वावरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास विभाग सोलापूर विना पवार यांनी आज(दि.8) नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलवली. यावेळी या पदासाठी ताई सचिन वावरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विना पवार यांनी घोषित केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी काम पाहिले.


या निवडीच्यावेळी माजी सरपंच व पंचायत समिती सदस्य तुकाराम देशमुख माजी नगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख, शिवाजीराव देशमुख, सचिन वावरे, महादेव देशमुख, पांडुरंग वाघमोडे, अशोक देशमुख, आबासाहेब धाईंजे, सर्जेराव जानकर, रेश्माताई टेळे, माजी उपनगराध्यक्ष पूनम वळकुंदे, नगरसेवक कैलास वामन, रघुनाथ चव्हाण, कोमल जानकर, प्राजक्ता ओहोळ, पुष्पा कोळेकर, पंचायत समिती माजी सदस्य अनिल सावंत, सुरेश टेळे, अजिनाथ वळकुदे, रणजीत ओहोळ, महेश वावरे आदी उपस्थित होते. ताई वावरे यांची नगराध्यक्षपदी निवड होताच त्यांच्या समर्थकांनी नगरपंचायत कार्यालयापासून त्यांची हनुमान मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली .

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button