पंतप्रधान मोदी यांच्या सभेस येणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे : पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे

पंतप्रधान मोदी यांच्या सभेस येणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे : पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰सुजाता सुहास गोखले
माळशिरस दिनांक 28/04/2024 :
पंतप्रधान मोदी यांच्या सभेस येणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात माढा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवार दिनांक 30/04/2024 रोजी सकाळी 10 वाजता माळशिरस येथे सभा घेण्यात येणार आहे .पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या सुरक्षेच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व नागरिकांचे तपासणी होणे गरजेचे आहे व तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून सभेस येणाऱ्या नागरिकांनी सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरुवात करावी असे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे .त्यामुळे नागरिकांची सुरक्षा तपासून वेळेमध्ये पूर्ण होऊ शकेल.तसेच पंतप्रधान मोदी यांचे आगमनापूर्वी एक तास अगोदर सर्व नागरिकांनी सभामंडपात येणे आवश्यक आहे .तसेच सभेस येणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी सभेस येताना मोठ्या बॅगा, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, ज्वालाग्रही पदार्थ उदाहरणार्थ लाईटर, काडेपेटी इत्यादी, तसेच विडी, सिगारेट, गुटका असे पदार्थ सोबत आणू नयेत. सभेसाठी दिलेल्या वेळेत सभास्थळी यावे व काही गडबड न करता जिल्हा पोलीस प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.