माळशिरस येथील शासकीय गोदामात मतदान यंत्रे तयार करण्याचे पूर्वप्रशिक्षण संपन्न

माळशिरस येथील शासकीय गोदामात मतदान यंत्रे तयार करण्याचे पूर्वप्रशिक्षण संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 सुजाता सुहास गोखले
माळशिरस दिनांक 28/04/2024 : माढा लोकसभा मतदार संघांतर्गत माळशिरस विधानसभे मध्ये 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 338 मतदार संघासाठी प्रत्यक्ष मतदानासाठी लागणारी मतदान यंत्रे तयार करण्याचे काम माळशिरस येथील शासकीय गोदाम मध्ये दिनांक 29 आणि 30 एप्रिल रोजी होणार आहे .
त्याची पूर्व तयारी म्हणून आज सहाय्यक निवडणूक अधिकारी, प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी मतदान यंत्रे तयार करून घेणेसाठी नेमण्यात आलेल्या सर्व तलाठी मंडल अधिकारी ,क्षेत्रीय अधिकारी याना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणासाठी माळशिरस तालुक्याचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी ही सहभाग घेतला .असे नोडल अधिकारी ( मीडिया) तथा सहा.गटविकास अधिकारी किरण मोरे यांनी माहिती दिली