राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कारासाठी गरुड फाउंडेशनचे आवाहन !

राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कारासाठी गरुड फाउंडेशनचे आवाहन !
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे.
अकलूज दिनांक 28/04/2024 :
गरुड फाउंडेशन यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
“सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक/ डिजीटल मीडिया), युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्राम विकास आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रेरणा, प्रोत्साहन देण्याचे हेतूने गरुड फाउंडेशन द्वारे राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश पुजारी यांनी साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता आणि aklujvaibhav.in ला सांगितली.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुकांनी व्हॉटसॲपवरच आपला प्रस्ताव ९८६०९४९६०० / ९०९६५०६१५० या नंबरवर १० मे २०२४ पर्यंत पाठवावे असे आवाहन गरुड फाउंडेशन’चे अध्यक्ष आकाश पुजारी यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.