ताज्या घडामोडी

खा. संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा बट्ट्याबोळ केला

खा.संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा बट्ट्याबोळ केला

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 13/04/2024 :
काय कुठून कुणाला अवदसा आठवली अन् डोंबारनीचा खेळ अंगलट आला अशी काही तरी वाक्य माझ्या लहानपणी कानात सतत गुणगुणवायची पण ही असली वाक्य माझ्या पुढच्या उतरत्या वयात अवतीभवती पिंगा घालतील अशी पुसटशी सुध्दा मला नव्हती. पण ही नियती आहे. त्यामुळे ती कुणापुढे पिंगा घालेल याचा काही नेम नाही. असो. तो निती धर्म आहे पण हा नवीनच राऊत धर्म नावाचा प्रकार शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वकष्टाने जन्माला घातला आहे. कारण कारभारी जोमाने नाही तर दमाने करता करता उध्दवांची उरलीसुरली शिवसेना विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भस्मासुरासारखी बच्चकन गिळली तरी अवचित घटकेचे माजी मुख्यमंत्री अजूनही भानावर येत नाही. कारण त्यांचा राजकीय ताण सुटला आहे. परिणामी घरबश्या बैलांना ऐनकेन प्रकारे कायमचं घरी बसवलं पाहिजे असाच संकेत बहुदा दस्तूरखुद्द संजय राऊत यांनी दिला असावा असे वाटते .
उघडा डोळे बघा निट , पण डोळे आमचे अन् थोबाड मात्र विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच हा सगळा सावळा गोंधळ आता पाहणं अतिशय चित्तथरारक आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांची त्यांच्या शाब्दिक भाषेत नको तितकी अब्रुची लक्तरे काढली तरीही राऊतांचा मोडीत निघालेला दांडा ताठ , कारण ते राऊत आहेत. तुम्ही त्यांची जाहिरपणे कपडे उतरवा पण आपल्या नंग्यावर सुद्धा ते सूट बूट असल्याचा आव आणतील. याची सत्व परीक्षा बघायची असेल तर तुम्ही जरुर येत्या चार मे नंतर पाहू शकता. त्यावेळी ते भाजपने लोकसभा निवडणुकीत कस काय ईव्हीएम मशिनवर कबज्या केला आणि ते मशीन कसकाय हाय युईथ जॅक केल याच भाकीत करत असताना मिळेलच. तर असे हे विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत आहेत. कारण ते न लाभलेल्या पंतप्रधान शरदचंद्र पवारसाहेब यांचे पायपुसरे आहेत.
आता या राऊतांनी आजपर्यंत अनेकदा अकलेचे तारे तोडून तोडून त्याच तारेची अवहेलना केली आहे आहे. त्यामुळे त्यांची राजकीय औकात काय आहे किंवा ते ती सिध्द करू शकत असतील तर ते आजपर्यंत कुठलीच अगदी ग्रामपंचायती पासून ते थेट लोकसभेपर्यंतची निवडणूक का लढवू शकत नाही , अरे तुम्ही योद्धे आहात तर या मैदानात या ! पण हे रणछोडदास आहेत हेच यातून स्पष्ट होते. अन् याच रणछोडदासांनी या देशात काॅंग्रेस प्रणित राजवट येणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बहुतांश भाजपचे किंवा त्यांना समर्थन करणारे तुरुंगात जाणार असं विधान करून तुमच्या आमच्या पोटाची हसून हसून मुरकुंडी वळवली असेल. पण हे बाष्कळातले बाष्कळ आहे. त्यांच अती घेतलेलं एरंडेल सकाळी कोण थांबवणार ? तर त्या विश्व प्रवक्त्याची औकात काढून काॅंग्रेस पक्षाने या राज्यातून काढता पाय घूमजाव करून घेतला आहे.

राजाभाऊ त्रिगुणे ,
सातारा .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button