ताज्या घडामोडी
युवा बचत गट अंजनगाव तर्फे दहा हजार रुपयांची आर्थिक मदत

युवा बचत गट अंजनगाव तर्फे
दहा हजार रुपयांची आर्थिक मदत
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/04/2024 :
अंजनगांव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील शेतकरी गणेश शंकर सलगर यांच्या दोन गाईंचा विज पडुन मृत्यु झाला .त्याना अंजनगाव येथील युवा बचत गटा कडून 10000 रूपये आर्थिक मदत करण्यात आली.
“नैसर्गिक आपत्तीने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या पशुपालक शेतकरी गणेश सलगर यांच्यापर्यंत आणखी आर्थिक मदत पोहोचली पाहिजे” अशी भावना याप्रसंगी युवा बचत गटातील सदस्यांनी व्यक्त केली.
संकटकाळात धावून जाऊन आर्थिक मदत करणाऱ्या अंजनगाव येथील युवा बचत गटाचे सर्वत्र कौतुक होत आहे.