ताज्या घडामोडी

“हेलपाटा” कादंबरीला उत्कृष्ट कादंबरीचा 8 वा पुरस्कार प्रदान …!

“हेलपाटा” कादंबरीला उत्कृष्ट कादंबरीचा 8 वा पुरस्कार प्रदान…!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 11/03/2024 :
१० मार्च २०२४ रोजी श्रीरामपुर येथे भरलेल्यालोककला, कलावंत, साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित डाॅ. लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध चिञपट गीतकार व चरिञ अभिनेते बाबासाहेब सौदागर यांचे हस्ते तानाजी धरणे लिखित “हेलपाटा” कादंबरीला डाॅ.लोकशाहिर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्रदान करणेत आला . हा हेलपाटा कादंबरीला मिळालेला ८ वा पुरस्कार आहे .
यावेळी संमेलनाध्यक्ष सायमन भारस्कर (ज्येष्ठ साहित्यिक ), सुभाष ञिभूवन, बाबुराव उपाध्ये ( ज्येष्ठ साहित्यिक), लहानु खरात, रघुनाथ खरात, सुरेश कांबळे( आला बाबुराव फेम ),सुभाषजी सोनावणे साहित्यिक गोरखनाथ पवार व संयोजक बाबासाहेब पवार व साहित्यिक हजर होते . यावेळी उपस्थितांना बाबासाहेब सौदागर यांचे मौलिक विचार ऐकवयास मिळाले . “कविता ही वरवर न करता थेट काळजातुन आलेली व काळजाला भिडणारी असावी ” असे मार्गदर्शन त्यांनी नवकविंना केले . आपल्या जीवनाच्या जडणघडणीचे अनेक कटु प्रसंग सांगुन ” आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार असतो ” याचे महत्व पटवून दिले . त्यांचे जीवनातले अनेक अनुभव उपस्थितांना खुप प्रेरणा देऊन गेले . बाबासाहेब सौदागर यांनी लिहिलेली गीतं महागायक सुरेश वाडकर , महागायिका आशा भोसले, भारतरत्न गानकोकिळा स्व . लता मंगेशकर यांच्यासह अनेक दिग्गज गायकांनी गायली असुन चिञपट सत्ताधिश ,झुंजार , सवत ,झुंज एकाकी, मी सिंधुताई सकपाळ , हळद तुझी कुंकू माझं, चिमणी पाखरं या सह ७८ मराठी चिञपटात गीत लेखन केलेले आहे .तसेच अनेक चिञपटात त्यांनी चरिञ अभिनय केला आहे .अशा बहुरंगी वलयांकीत पाहुण्यांच्या हस्ते ” हेलपाटा ” कादंबरीला पुरस्कार मिळाल्यानं आपल्याला विशेष आनंद झाला असल्याचं मत ” हेलपाटा ” कादंबरीचे लेखक तानाजी धरणे यांनी “अकलूज वैभव” समोर व्यक्त केले . साहित्यिकांनी हातात लेखनी घेवून समाजप्रबोधनाचे कार्य करण्याची गरज आहे असे मत व्यक्त साहित्यकांनी व्यक्त केले . तसेच या साहित्य संमेलनाचे सुंदर असे आयोजन केल्याबद्दल आयोजक कवी लेखक बाबासाहेब पवार व त्यांच्या टिमचे कौतुक केले . व उपस्थितांचे आभार मानले .

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button