महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे उदघाटन थाटाने संपन्न

महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे उदघाटन थाटाने संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/03/2024 : महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर च्या वतीने आयोजित केलेल्या यंदाच्या महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे उदघाटन रविवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी चार वाजता
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या हस्ते थाटाने संपन्न झाले. यावेळी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, कारखान्याचे आजी-माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, यात्रा महोत्सव समितीच्या विविध विभागाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
रविवार दिनांक 3 मार्च ते 9 मार्च 2024 या कालावधीत आयोजित केलेला आहे. महाशिवरात्री यात्रेनिमित्त कृषी व औद्योगिक प्रदर्शन यामध्ये पीक स्पर्धा दुग्ध स्पर्धा तसेच जनावरांचा बाजार व जंगी निकाली कुस्त्यांचा फड भरवण्यात आलाआहे.
महाशिवरात्री निमित्त शंकरनगर येथील शिव पार्वती मंदिरामध्ये शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी पहाटे सव्वा पाच वाजता आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील या उभयतांच्या हस्ते अभिषेक व महापूजा आयोजित केलेली आहे. शिवतीर्थ आखाडा शंकरनगर येथे जंगी निकाली कुस्त्यांच्या फडाचे उद्घाटन व विजेत्या मल्लांना बक्षिस वितरण समारंभ शनिवार दिनांक 9 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे उपस्थितीत आणि यात्रा महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती महाशिवरात्र यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी सांगितले.
पीक स्पर्धेमध्ये ठेवावयाचे शेतीमालाचे नमुने व पिके यामध्ये उभी पिके, फळे, पालेभाज्या, फळभाज्या व फुले रविवार दिनांक 3 मार्च ते बुधवार दिनांक 6 मार्च सायंकाळी पाच वाजेपर्यंत पिक स्पर्धा कमिटी कडे दाखल करावेत. फुलांचे नमुने गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत स्वीकारले जातील. बुधवार दिनांक 6 मार्च रोजी रात्री आठ वाजेपर्यंत प्रदर्शनातील जनावरांची नोंदणी जनावरांचे प्रदर्शन कमिटीकडे केली जाईल. दुग्ध स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपले जनावरांची नोंदणी जनावरे जनावरांचे प्रदर्शन कमिटीकडे सात मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावी. असेही यात्रा महोत्सव समितीच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
शिवपार्वती मंदिराच्या पायथ्याजवळ भरविण्यात आलेल्या महाशिवरात्र यात्रा महोत्सवात यात्रा कमिटीने पिण्याच्या पाण्याची व विजेची 24 तास सोय केलेली आहे.
शनिवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व कुस्त्या नेमल्या जातील व दुपारी 3 वाजता कुस्ती मैदानाचे उद्घाटनानंतर कुस्त्यास प्रारंभ होईल. शिवतीर्थ आखाड्यामध्ये शेवटची कुस्ती सायंकाळी सात वाजता बेमुदत निकाली होईल असेही यात्रा महोत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले.