ताज्या घडामोडी

शेत खाणारे कुंपण अर्थात दलित शोषणकर्ते

संपाकीय……✍️

शेत खाणारे कुंपण अर्थात दलित शोषणकर्ते

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

अकलूज दिनांक 03/03/2024 :
अकलूज येथील सिटी सर्वे नंबर 987/ 61 तत्कालीन बॅकवर्ड हाउसिंग सोसायटी मधील अतिक्रमण काढणे रस्ते व गटारी करणे अतिक्रमित लोकांचे त्याच ठिकाणी रीतसर जागा नावावर करून देऊन त्यांना कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत घरकुले बांधून देण्यात यावीत इत्यादी मागण्यांसाठी अकलूज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ दिनांक 26 फेब्रुवारी पासून उपोषण सुरू आहे. शासकीय कार्यालयीन वेळेत सुरू असलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून पोलीस प्रशासना व्यतिरिक्त महसूल विभागातील तलाठ्यापासून कलेक्टर पर्यंत कोणीही आतापर्यंत उपोषणकर्त्यांची दखल घेतलेली नाही. यावरूनच दलित बांधवांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर प्रशासन किती उदासीन आहे हे स्पष्टपणे उघडे पडले आहे. अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी मात्र या उपोषणकर्त्यांच्या उपोषणाचा फायदा घेऊन उपोषणाचा संबंध नसणाऱ्या जागेतील अतिक्रमणाची एक मोहीम राबवून काय साध्य केले हे मात्र आम्हाला माहित नाही. उपोषणकर्ते समाजसेवक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे,( महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी अर्थात राष्ट्रीय पिछडा आयोग दिल्ली), सामाजिक कार्यकर्ते विलासनंद विठ्ठल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ मोहन जाधव या त्रिमूर्तींनी सुरू केलेल्या कार्यालयीन वेळेतील उपोषणाच्या सहाव्या दिवशी सखुबाई सदाशिव धाईंजे, लोचना मोहन जाधव, विजया पांडुरंग गायकवाड, संजय तुकाराम नवले, दिपक विलास धाइंजे, हिराबाई विश्वनाथ शिरसागर, राबिया सलीम शेख, तुषार वसंत लोंढे, राज संजय खंडागळे, खंडू सखाराम चव्हाण, सुनिता तुळशीराम झेंडे, साजिदभाई सय्यद, शारदा रमेश साळुंखे, भारत महादेव वाघमारे, सागर सिद्धार्थ जगताप, दत्ता मल्हारी शिंदे, केतन तुळशीराम झेंडे, सोलापूर जिल्हा जिल्हा आर पी आय सचिव भारत इराप्पा आठवले,
वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत व्ही. नेटके, कर्जत तालुकाध्यक्ष पोपट एकनाथ शेटे, कर्जत अध्यक्ष आरपीआय नितीन आदिनाथ चव्हाण, किशोर प्रल्हाद जरेकर कर्जत, पत्रकार अनिल तानाजी साठे, राजू आगंद गायकवाड, सदाशिव ज्ञानोबा धाईंजे, साहेबराव दत्तू घोडके, दिपक पिराजी मिसाळ, संजीवनी भीमराव गायकवाड इत्यादींनी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला. वास्तविक पाहता या सर्वे नंबर मधील असणाऱ्या रस्त्याचा काही भाग तसेच काही प्लॉट हाउसिंग सोसायटीच्या तत्कालीन काही पदाधिकाऱ्यांनी आर्थिक हितसंबंधापोटी बेकायदेशीरपणे विकले. काहींनी स्वतःला एक गुंठा जागा असताना दोन गुंठ्यापासून सात गुंठेपर्यंत अतिक्रमण करून स्वतःचे बस्तान तर बसविलेच या शिवाय स्वतःचे सगे सोयरे यांना त्या ठिकाणी वसविले (यातील रहिवाशांना पूर्वीपासूनच अन्य ठिकाणी जमीन, जागा, जुमला, राहती पक्की घरेआहेत.) तर काहींनी सोसायटीच्या ऑफिसच्या दोन खोल्या पाडून त्या ठिकाणी स्वतःचे घर घातले. हळूहळू पाय पसरविले. बुद्ध विहार बांधण्यासाठी ज्याठिकाणी स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून टिकाव मारून पाया खोदाईचा शुभारंभ करण्यात आला त्याठिकाणी बुद्ध विहार न होता काय झाले आहे हे सर्वांनाच माहित आहे. तसेच या जागेत असणारा सार्वजनिक आड ज्याचे पिण्याचे पाणी महिला भगिनी रहाटाने सेंधून भरत होत्या त्याचे काय झाले हे देखील यापरिसरातील सर्वांना माहीत आहे. शेत खाणारे कुंपण अर्थात दलित शोषणकर्ते असा
या ठिकाणी कुंपणानेच शेत खाल्ले असा प्रकार सुरू आहे. मनगटशाही, गुंडगिरी च्या जोरावर दलित बांधवांचे शोषण धन दांडगा दलितच करीत आहे यापेक्षा मोठी शोकांतिका दुसरी नाही. दलितांच्या अडचणी सोडवून त्यांना घटनेने दिलेले अधिकारात जीवन जगण्याचा हक्क जगण्यासाठी मदत करण्याचे सोडून आडमुठेपणाने स्वार्थाने अंध झालेले काही दलित कार्यकर्तेच आपल्या दलित बांधवांचे शोषण करून आणि स्वतः अत्यंत मोठा कार्यकर्ता असल्याचे भासवून गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध पक्षाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. कोणत्या व्यक्तीला कोणत्या पदावर घ्यावे हा ज्या त्या पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळींचा प्रश्न आहे. त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा आम्हाला कोणताही अधिकार नाही याची आम्हाला जाणीव आहे. त्यांना पद मिळाले म्हणून आमच्या पोटात दुखायचे काहीही कारण नाही. त्यामुळे दुखतही नाही आणि कधी दुखणार ही नाही. तरीही आपण नियुक्त करीत असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं सामाजिक योगदान काय आहे? ते समाजासाठी कितपत योग्य आहेत याची तरी किमान थोडीशी त्यांनी माहिती घ्यायला हवी असं आमचं ठाम मत आहे. आपल्या शेजारीपाजारी राहणाऱ्या दलित बांधवांचे शोषण करून वरिष्ठ पातळीवरील पद उपभोगणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांची चौकशी होऊन त्यांचे वर सोपविलेला पदभार कितपत योग्य आहे याची शहानिशा वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी करणे गरजेचे आहे. असे आम्हाला वाटते. यातील सर्वांशीच आमचे वैयक्तिक कसलेही व कुठलेही मतभेद नाहीत अथवा कोणतेही भांडण नाही. त्या सर्वांशी आमचे वैयक्तिक संबंध अत्यंत चांगले आहेत. आपापल्या पातळीवर आम्ही एकमेकांना मानतो. तरीही नाईलाजास्तव आम्हाला हे स्पष्टपणे मांडणे हे आमचे नैतिक कर्तव्य आम्ही मानतो.असो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दलित वस्तीसाठी असणाऱ्या रस्त्याची वाट लावून दलित बांधवांची कोंडी करून हयात नसणाऱ्या आणि हयात असणाऱ्या व्यक्तींकडून येथील तमाम दलित बांधव वेठीस धरला गेला आहे आणि या ठिकाणी असलेल्या एका खाजगी जागा मालकाने स्वतःच्या मालकीतील काही जागा या दलित बांधवांसाठी जाणे येण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. जाणे येण्यासाठी खाजगी मालकावर वाट देण्याची वेळ का आली? त्यासाठी त्यावेळी कोणते रामायण महाभारत घडले? हे देखील या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सर्व लहान थोर दलित बांधवांना ज्ञात आहे. वास्तविक पाहता सदर खाजगी मालकावर ही वेळ यायला नको होती हेही सर्वांना माहीत आहे. पण ती वेळ कोणी आणली हे सर्व जाणतात. या परिसरात वास्तव्य करीत असलेल्या सर्वांनीच अंतर्मुख होऊन एक वेळ विचार करावा जर या खाजगी जागेच्या मालकाने ही वाट बंद केली तर दलित वस्तीमध्ये येणाऱ्याने यायचे कुठून व जाणाऱ्याने जायचे कुठून हा बिकट प्रश्न उपस्थित होणार आहे. आणि त्या वेळेला मात्र वेगळे चित्र निर्माण होईल. आपण केलेली बेसुमार अतिक्रमणे करणाऱ्या मोठ्यांना आपण बळकवलेल्या जागा सोडाव्या लागतील म्हणून त्यांनी ऐन केन प्रकारे सदर खाजगी मालकाच्या जागेतून सध्या तरी जाण्या येण्यासाठी वाट मोकळी करवून घेतली आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणामुळे सर्व हळूहळू उघडे पडू लागले आहे. मी मी म्हणणाऱ्यांनी या उपोषणाची धास्ती घेतली आहे. या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या सर्वच लहान थोरांच्या मनामध्ये या उपोषणकर्त्यांच्या विरोधात विघ्न संतोषी, स्वार्थी संबंधितांनी खोट्या नाट्या अफवा पसरवून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु हळूहळू प्रत्येक माता-भगिनींच्या लक्षात या उपोषणकर्त्यांनी सुरू केलेल्या उपोषणा संदर्भात वास्तव माहिती येऊ लागल्याने त्यांनी खोट्या अफवांना बळी पडून करीत असलेला विरोध सोडून तासंतास उपोषण स्थळी बसून उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पाठिंबा देणे सुरू ठेवले आहे. त्या बदल्यात ज्यांनी अती अतिक्रमण केले आहे त्यांच्याकडून, त्यांच्या महिला वर्गाकडून शिव्या, शाप, धमक्या ऐकून घ्याव्या लागत आहेत. हेही दररोज आमच्या कानावर येत आहे. आम्ही ते प्रसारमाध्यमांद्वारे मांडत आहोतच. “इतके दिवस झालं नाही आणि आता होतंय होय?” असाही सूर या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या आमच्या वाचाळ आणि निष्क्रिय, निराशावादी हितचिंतकांकडून व्यक्त होत आहे. तथापि येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या जवळपास सर्वच कुटुंबातील माता-भगिनींनी दररोज येऊन आम्हाला पाठिंबा देऊन आमचे मनोबल वाढविण्याचे कार्य अखंडपणे सुरू ठेवलेले आहे. ही सगळ्यात महत्त्वाची उपोषणकर्त्यांची जमेची बाजू ठरत आहे. ज्यांनी अती गिळंकृत केले आहे. जेअजूनही आपल्याच दलित बांधवांचे शोषण करीत आहेत त्यांच्या पोटावर उपोषणकर्त्यांचा पाय आहे हेआम्ही यानिमित्ताने जाहीरपणे ठासून सांगत आहोत आणि कारवाई सुरू झाल्याशिवाय उपोषणापासून हटणारही नाही हाआमचा वैयक्तिक निर्धार याठिकाणी आम्ही संपादकीय द्वारे जाहीर करीत आहोत. मोठ्यांनी अतिक्रमित केलेल्या जागा मोठ्या मनाने, स्वखुशीने परत कराव्यात. अतिक्रमण काढण्यास विरोध करू नये आणि आपल्याच दलित बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार्य करावे. त्यांनाही घटनेनुसार मूलभूत जगण्याचा अधिकार प्राप्त करून द्यावा. जेणेकरून हेच दलित बांधव पुन्हा आपणाला डोक्यावर घेऊन नाचतील अन्यथा हेच तुमच्याकडून शोषित झालेले दलित बांधव योग्य वेळ येताच तुम्हाला पायाखाली घेतील असे आम्हास चित्र दिसत आहे हेचित्र बदलायचे असेल तर याक्षणापासून स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात करावी अशी जाहीर नम्र विनंती आम्ही याठिकाणी करीत आहोत  पाहूया यापुढे काय घडते ते!

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button