पत्रकारांना सूत्रे विचारण्याचा अधिकार पोलीस प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांना नाही सर्वोच्च न्यायालयाचा सज्जड इशारा

पत्रकारांना सूत्रे विचारण्याचा अधिकार पोलीस प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांना नाही सर्वोच्च न्यायालयाचा सज्जड इशारा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 21/02/2024 : जोपर्यंत ठोस पुरावे,साक्ष तपासली जात नाहीत तुम्हाला पत्रकारांना सूत्रे विचारण्याचा अजिबात अधिकार नाही असा सज्जड इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे यासंदर्भात उच्च न्यायालयाने सांगितले की आता पोलिसांनी असे करताना आपली कठोर भूमिका बजावण्यास सांगितले आहे तसे नसेल तर न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. पत्रकारावर गुन्हे दाखल सुनावणी प्रकरणी
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले की, घटनेच्या कलम 19 व 22 नुसार पोलीस कोणत्याही पत्रकारांची सूत्रे विचारू शकत नाही व पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारबाबत न्यायालयही रोखू शकत नाही. आजकाल पोलीस प्रमुख पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा लादत आहेत बहुतांश पोलीस अधिकारी स्वतःला चांगले बनवण्यासाठी असे करीत असतात असा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने सांगितले की आता पोलिसांनी असे करताना आपली कठोर भूमिका बजावण्यास सांगितले आहे तसे नसेल तर न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
कोणतीही बातमी छापण्यासाठी पत्रकार त्यांच्या स्त्रोताचा वापर करतो परंतु अनेक वेळा भ्रष्ट राजकीय माफिया व पोलीस अधिकारी संगनमताने पत्रकाराला त्रास देत असतात असे निदर्शनास आले आहे. अशीच घटना छत्तीसगडमधील भोपाळ मध्ये घडली महिला पत्रकारांना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र महिला पत्रकाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्त्वाचा आधार घेतला होता या फार्मूल्यामुळे पत्रकारांना कोणीही अटक करू शकत नाही असे न्यायालयाने सांगितले