ताज्या घडामोडी

दैनिक गुराज्य ची वृत्तपत्रीय हागणदारी ,,,, इरवडी चां खुराक खाण्यासाठी मोकाट टोळकी चौखूर उधळली,,,,,,,!

दैनिक गुराज्य ची वृत्तपत्रीय हागणदारी ,,,, इरवडी चां खुराक खाण्यासाठी मोकाट टोळकी चौखूर उधळली,,,,,,,!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 21/02/2024 :
पत्रकारिता हा समाज मनाचा आरसा असावा. आणि त्यात स्वच्छ असे जन माणसाचे मानसिक कलाचे प्रतिबिंब असावे. तरच त्या वृत्तपत्राची विश्वासार्हता टिकावू असते.
वृत्तपत्राचे निरीक्षण , राजकीय विश्लेषण हे निरपेक्ष आणि तटस्थ असावे.स्व मत किंवा जाहिरात आणि आर्थिक आमिषाने त्यात अवाजवी व एक कल्ली केलेली ढवळाढवळ नसावी.ही साधी अपेक्षा.
सोलापूर जिल्ह्यातील जुन्या दैनिकानी आणि दैनिक संचार चे संपादक स्वर्गीय आदरणीय रंगा अण्णा वैद्य सारखी मंडळी जिल्ह्याने पाहिली. त्यांची पत्रकारिता , बातम्या तील विश्वासार्हता पाहिली , आणि त्या मुळे हे नाव काळाच्या खडकावर कोरले गेले. त्यांना मिळालेला आदर आजच्या बाजार बसव्या रंडीखाना चालवून फक्त आर्थिक कमाईचे साधन म्हणून सर्व साधन शुचिता बाजूला ठेऊन कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळलेल्या दैनिक”गुराज्य”चे वृत्त संपादकाने केलेले राजकीय विश्लेषण हे , आर्थिक प्राप्तीचे इरवड चे फलित आहे असेच म्हणावे लागते.
खा रणजितसिंह निंबाळकर यांना मिळालेले एक लाखाचे लीड हे मोहिते पाटील यांचे नसून ते उत्तमराव जानकर यांच्या मुळे असल्याचा महान शोध त्यांनी त्यांच्या विश्लेषणात लावला. आणि हा निकष ज्या कसोटी वर तपासला ती कसोटी माळशिरस विधानसभा मतदार संघाची होती.वरकरणी पाहिले तर हा त्यांचा युक्तिवाद खरा वाटतो. त्यांनी निर्माण केलेले प्रश्नचिन्ह खरे वाटते.
पण खरी मेख इथेच आहे.राजकारणात कांहीं नेतृत्व ही फक्त एक गाव , एक तालुका या पुरती सीमित नसतात.त्यांच्या प्रभाव क्षेत्रात कोण व कोणते विभाग येतात यावर ते ठरते.राजकारणातील कच्चा अभ्यास असल्याने , मोहिते पाटील आणि अकलूज चे समीकरण लावून ते मोकळे झाले. पण ते हे विसरतात की मोहिते पाटील हे संसदीय राजकारणातील 50 वर्षाहून अधिक काळ राजकारणात असलेलं नाव आहे.
कै.वसंत दादा पाटील यांचा प. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील जो गट होता त्या गटाची धुरा एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्यावर आली. सहकारी साखर कारखानदारी, वसंत दादा शुगर संघ , साखर संघ , शिखर बँक , अश्या विविध आस्थापनात या विभागातील कारखानदारांचे प्रतिनिधित्व ते करत राहिले. साखर कारखाने गाळप परवाने , साखर दर , ऊस दर , या संबंधाने आणि आयात निर्यात धोरण ठरवताना शासनाशी चर्चा करणे , या कारखान्यांना आर्थिक मदत , कर्ज पुरवठा , इथेनॉल धोरणे , अश्या अनेक बाबी यांचा समावेश असतो , ही कामे या चळवळीचा प्रमुख घटक म्हणून , आणि एक राज्यकर्ता म्हणून केली आहेत व अद्याप ही करत आहेत.
म्हणून त्यांना फक्त माळशिरस तालुक्यातील एका लोकसंख्या गठ्ठया पुरते सीमित दाखवण्याची पहिली चूक त्यांनी जाणीवपूर्वक केली आहे.
कुमठा येथील कै ब्रह्मदेव माने, मा. आ. निर्मलाताई ठोकळ , कै. मा. आ. बाबुराव अनगरकर, कै. रतनचंद शहा , कै. मारवाडी वकील , कै. भाई एस. एम. पाटील , माजी मंत्री दिलीप सोपल , कै. आ. दिंगबर जी बागल , कै. आ विठ्ठलराव शिंदे , कै भाई आ. गणपतराव देशमुख , बळीराम काका साठे , वै. श्रीमंत आ. सुधाकर परिचारक , कै. वसंतराव काळे , चेअरमन प्रा. शिवाजीराव काळुंगे , आ. दीपकआबा साळुंखे पाटील यांचे वडील कै. काकासाहेब साळुंखे पाटील , अशी किती नावे घ्यावीत ?
या प्रवासात या विभागातील जनता , कार्यकर्ते यांचे जाळे उभा राहिले तो मतदार या नेत्याने सांगितले की मतदान करतो आणि हाच प्रभाव म्हणजे राजकीय शक्ती असते .
सांगली , सातारा , कोल्हापूर , सोलापूर , पुणे , अश्या प्रदेशातील ही नेते मंडळी एकमेकाशी जोडली गेलेली आहेत. तात्पुरत्या राजकीय स्पर्धा आणि यातील समज, गैरसमज यातून जो संघर्ष निर्माण झाला या मुळे सोलापूर जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या अस्थिरता आली ,
पण या अस्थिरते ने नेमके काय साध्य झाले? दस्तुर खुद्द पवार यांनीही ही बाब स्पष्ट केली की राजकारणा शिवाय अनेक संस्थात्मक पातळीवर आम्ही एकत्रित आहोत व ती एक मेकाची गरज आहे. कल्याणराव काळे यांच्या चंद्रभागा सह साखर कारखान्यास रोखून धरलेला निधी ही सहकारात राजकारण नको म्हणून खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी रिलीज करण्यास भाग पाडले.ना.अजितदादा यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या व्यक्तिगत प्रॉपर्टी तारण म्हणून ठेवण्याच्या अटी घातल्या होत्या त्या रिलीज करण्याचा निर्णय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.
सांगोला येथील कार्यक्रमात पवार आल्या नंतर तिथेच आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती.तेंव्हा दस्तुर खुद्द उप मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे भाषण चालू होते.ही भेट अंधारात घेतलेली नव्हती. राजकारण इतक्या कोत्या मनाचे नसते. आणि ते इतके उथळ ही कधीच नसते.ज्यांच्या आयुष्याची 80 वर्ष उलटून गेली आहेत आणि 1972 पासून 2019 पर्यंत ज्यांचा प्रवास सोबतीने झालेला आहे,त्यांनी कायम स्वरुपी एक मेका चे विरोधात टोकाने व्यक्तिगत दुष्मणी करावी इतकी खालची वैचारिक पातळी गल्ली बोळातील क्षुद्र प्रवृत्तीच्या टिन पाट कार्यकर्त्याचीच असते. वरिष्ठाशी कसे अदबीने बोलावे ? त्यांचेशी आपले वर्तन कसे ठेवावे याचे धडे “शिवरत्न” ने त्यांचेत जन्मलेल्या पिढीला दिले. इतकेच काय , “शिवरत्न” वरील कार्यकर्ता ही त्याच भावनेतून असे वर्तन करतो.
हा आदर्श ज्यांना माहीत नसतो , ज्याचे वर्तन गुंड गिरी आणि अरेरावी चे असते त्यांना हे खानदानी संस्कार माहीत नसतात.
आदरणीय शरद पवार यांनी “शिवरत्न” ला भेट दिली त्या प्रसंगी धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांच्या वर लिहिलेली पुस्तिका साहेबांना दिली. याचा ही अन्वयार्थ काढला गेला. तो अश्याच उठवळ पत्रकारितेतूनच.
खा सुप्रिया सुळे यांनी किंवा जयसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेली पवार साहेबांची भेट फक्त राजकीय अर्थानेच का घेतली जावी?सदाशिवनगर येथील शंकर सह. साखर कारखाना याचे ही कांहीं प्रश्न होते.आणि त्याची सोडवणूक करणे हा त्यांचा प्राधान्य क्रम असू शकतो. असा विचार कुणी का केला नाही?
पण विद्यमान खा. हे गुणी आणि पक्षनिष्ठ आहेत तर मोहिते पाटील हे दबाव तंत्र वापरतात व ते पक्षनिष्ठ नाहीत अस कांहींस यांना सुचवायचे असते .आत्ता असा कोणताही तालुका , कोणतेही गाव राहिलेले नाही की जिथे गट अस्तित्वात नसतात.माळशिरस तालुका तरी यास कसा अपवाद राहील?
मोहिते पाटील यांच्या कुक्कुट पालन संघाचे जे अंडी उत्पादित करत होते , किंवा सुतगिरणी चे , किंवा विजय शुगर , विजय , सुमित्रा पतसंस्था चे बंद चे राजकारण ही यात मांडण्यात आले. या इतका मूर्खपणा जगाच्या पाठीवर कोणता पत्रकार विश्लेषक करेल ?लेअर कोंबडी पालनातील खाद्य दराच्या वाढत्या किमती , आणि कमी होत जाणारे नफ्याचे प्रमाण उद्योग बंद होण्यास कारणीभूत असतो. इथे सुतगिरणी बंद पडली , अशीच सूतगिरणी माढा मध्ये ही बंद पडली. आणि तिच्या अवैध्य खरेदी प्रकरणात कोण दोषी ठरले ? हे ही दर्शवा ?
माळशिरस तालुक्यात खाजगी आस्थापना तील गाजावाजा करून सुरू केलेला कारखाना ही ओंकार शुगर चालवत आहे.याच ओंकार शुगर ने अंबुलगा येथील डॉ शिवाजीराव निलंगेकर यांचा कारखाना घेतला , कर्जापोटी लिलाव निघालेला असताना खरेदीदार म्हणून विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख पुढे सरसावले असता त्यांना कुणी दम देऊन बाजूला सारले. हे ही शोधा. जरंडेश्वर पासून ची माहिती घ्यायची असेल तर डॉ. शालिनीताई पाटील यांची व माजी आ. कॉम्रेड माणिकराव जाधव यांची ही भेट घ्या. अर्थकारणात निनावी नावाने कुणाचा पैसा कसा खेळतो ? हे ही तपासा. अश्याच वृत्तीतून थेट आदिनाथ पर्यंत हे लोण धडकले. पण हे प्रकार ही बाजार बसवी पत्रकारिता शोधणार नाही.
आपण प्रचंड लोकशाहीवादी आहोत आणि भामटे गिरी चे टोळके बनवून जन मताचा रेटा आमच्या कडे आहे असे दर्शवून भाजपा सारख्या केंद्रीय पक्षाची ही दिशाभूल आम्ही जाहिरातीचे आधारे करू अशी गणिते मांडून ही “इरवड” केली जात आहे. (पूर्वी लोक मोकळ्या पटांगणात संडास करीत , सूर्य प्रकाशात ती वाळलेली संडास गुरे खात त्यास इरवड असे म्हणतात)
आणि ती केली की रवंथ करताना जो श्वास सोडला जातो तो दर्प म्हणजे आजचे हे दैनिक गुराज्य चे राजकीय विश्लेषण आहे.
आम्ही इतकेच सांगतो की आमच्या निष्ठा तपासण्याचा अधिकार कुणा लफग्यांना आम्ही दिलेला नाही.
“ढुंसण्या हे वासरू गाई चे कासेला ही पान्हा फुटावा म्हणून मारते”तो दबाव नसतो , तो हक्क असतो.
परक्याच वासरू अश्या ढुंसण्या सोडा, जवळ जरी आले तरी तिचं गाय लाथा मारते.हा भाजपच्या हक्काचा मतदार संघ मित्रपक्षाच्या झोळीत टाकावा , आणि हेच जुने चेहरे तिकडून ही पुन्हा यावेत म्हणून तुमचे चाललेले चाळे आमच्या नजरे आड नाहीत.
मी ही दैनिकाचां संपादक होतो. एवढेच लक्षात ठेवा.
आणि अकलूजकरांच्या “सिंहाच्या आयाळी त हात घालण्याचे नादान पण करू नका.या जबड्याची ताकद अजमाऊ नका , ती पिल्ला साठी सुरक्षा तर शत्रू साठी कर्दनकाळ आहे.

ऍड. अविनाश टी. काले ,
अकलूज.
मो न 9960178213

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button