नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे

नवरा मेला तरी चालेल पण सवत
रंडकी झाली पाहिजे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 21/02/2024 :
‘राजा का बेटा राजा नही बनेगा , लेकीन जो काबील होगा वही राजा बनेगा ‘ ! हे झालं साध ,सरळ आणि तितकंच सुटसुटीत सुत्र पण ते आजकाल भाजप विरोधाने ग्रासलेल्या पक्षातील राजकारणी नेत्यांच्या काही केल्या गळी उतरत नाही म्हणून ते लायक नसलेल्या कोणा ऐऱ्यागबाळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी मारून मुटकून बसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे त्यामुळे ‘ नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे ‘ अशी त्यांची सुप्त इच्छा त्यातून प्रकट होते आता याला काय म्हणावे नाही का ॽ
मनात इच्छेने एकदा का घर करायला सुरुवात केली की मग ‘इच्छा माझी पुरी करा ‘ या नाटकाची निर्मिती झाली म्हणून समजा परिणामी यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल अशी एकूण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असणाऱ्या सर्व राजकीय पक्ष व त्यातील नेत्यांची स्थिती आहे , यासाठी कश्मिर पासून कन्या कुमारी पर्यंत एकजात वरकरणी सगळे एकवटले आहेत पण त्यासाठी त्याग करायला कुणीच तयार नाही , तिकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काॅंग्रेसला कस्पटासमान लेखतात तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर काॅंग्रेस हाच आपचा खरा शत्रू असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले आहे त्यात आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तर काॅंग्रेसचे सारे प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकून समाजवादी पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी राहुल गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील पिकनिक दौऱ्या दरम्यान त्यांच्याच तोंडावर फेकून मारली .
तरी लाचार झालेल्या काॅंग्रेसच्या नेत्यांना कुणीतरी सांगायला हवं की जगातील कोणत्याही भिकाऱ्याला त्याची आवड निवड विचारली जात नाही याचा अर्थ इतकाच की भिकाऱ्यांना आवड निवड नसतेच इतकी वाईट अवस्था काॅंग्रेस पक्षावर राहुल बाबाने लादली आहे अर्थात आजही काॅंग्रेसला जनमानसात स्थान आहे पण या बाबाने शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणे काॅंग्रेसची विल्हेवाट लावली आहे अर्थात ठाकरे काय किंवा गांधी काय हे दोन्ही नेते एकाच राजकीय नाण्याच्या दोन बाजू आहेत इतकाच काय तो फरक असावा .
अठराव्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे पण अजूनही इंडिया नामक आघाडीच्या पोतडीतून साधी आघाडी नावारूपाला येत नाही आणि महाराष्ट्राने ओवाळून टाकलेल्या पत्रकारांनी राजरोसपणे निवडणूक पूर्व ‘ सर्वे ‘ नावाचा रतीब घालायला सुरुवात केली आहे , यातून काल तर एका सर्वेक्षणातून महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी तब्बल चोवीस जागांवर विजयी घोषित करण्याचा पराक्रम या दिवट्यांनी केला आहे याचा अर्थ लग्नाचा पत्ता नाही पण नातवाच्या बारशाची निमंत्रण पत्रिका देखील छापून तयार आहे , इतकी लाचारी आजपर्यंतच्या इतिहासात कोणा पत्रकार अथवा त्यांच्या समूहाने केली नसेल तितकी सध्याच्या लाचार तळीरामांनी केली आहे त्यामुळे शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ता नसताना बारा हत्तीचे बळ आले आहे कारण ही सगळी बगळ्यांची लाचारी आहे , कारण सत्ता असताना मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या काळात हेच उध्दव ठाकरे मंत्रालयात अडीच तास सुध्दा गेले नाहीत त्यामुळे शरद पवार यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत प्रत्यक्षात उद्विग्न होऊन नाराजी व्यक्त करताना ठासून खडसावून सांगितले की ठाकरे यांची ही आधुनिक किमया आमच्या पचनी पडली नाही तरीही उध्दव ठाकरे हेच देशातील क्रमांक एकचे मुख्यमंत्री हे नेमकं कोणत्या लाचारीचे द्योतक आहे . कारण याच काळात महाराष्ट्रात कोरोनामुळे जितके बळी गेले तितके बळी उध्दव ठाकरे यांच्या फेसबुकवर काम करण्याच्या पध्दतीने गेले तरीही ठाकरे यांना जनतेची सहानुभूती हा काय प्रकार आहे .
उध्दव ठाकरे यांना एवढीच जर सहानुभूती होती तर त्यांनी मुख्यमंत्री असताना मुंबईसह राज्यातील अन्य महापालिकेच्या निवडणूका का घेतल्या नाहीत आणि आता न्यायालयात आरक्षणाचा खुट्टा मारुन मर्द असाल तर घ्या निवडणूका असा टाहो फोडत आहेत त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत तुमच्यात आणि शरद पवार यांच्यात किती दम आहे हे नक्की कळेल मग जमिनदोस्त झाला की ईव्हीएमच्या नावाने बोटे मोडू नका म्हणजे झालं , शरद पवार हे पुरंदरचे दिवंगत आमदार दादा जाधवराव यांची खिल्ली उडवताना नेहमी म्हणायचे ‘ बैल म्हातारा झाला की त्याची जागा गोठ्यात असते ‘ त्यामुळे महाविकास आघाडीच्या किती बैलांना मतदार गोठ्यात धाडणार आहे हेही लवकरच कळेल तोपर्यंत जरा थांबूया.
राजाभाऊ त्रिगुणे .
दिनांक -२१/२/२०२४ .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक