ताज्या घडामोडी

परमवीर चक्र प्रत्येकाला मिळत नाही

परमवीर चक्र प्रत्येकाला मिळत नाही

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 15/02/2024 :
आपणास माहित आहेच की सैन्यांमध्ये सैन्य दलाच्या प्रमुखांपासून ते सर्वसामान्य सैनिकाप्रमाणे पर्यंत ही सर्व यंत्रणा उभी आहे त्यास सैन्यदल म्हणतात
यामध्ये डॉक्टर आहेत कंपाउंडर आहेत कपडे धुणारे आहेत बूट पॉलिश करणारे आहेत जेवण करणारे स्वयंपाक करणारे आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व वरील कामे करणारे कर्मचारी आहेत त्यांना सैनिकी शिक्षण पूर्णपणे दिलेले असते प्रसंगी ते हातात शस्त्र घेऊन शत्रूशी चार हात करू शकतात
संधी मिळेलच असे नाही
अनेक सैनिकांना अगर सेनाधिकाऱ्यांना त्यांच्या पूर्ण सेवेचे वेळात एकाही युद्धाला सामोरे जावे लागत नाही तसेच अनेकांना ते निवृत्त होईपर्यंत सीमेवर शत्रूशी सामना करण्यास मिळत नाही पण नव्याने आलेला एखाद्या धाडसी सैनिकाला पराक्रम करण्याची संधी मिळते तशी वर्षानुवर्षी सैन्य दलात नोकरी करून लढाई करण्याची पराक्रम दाखवण्याची संधी मिळेलच असे नाही
मला पराक्रमाची संधी मिळाली नाही म्हणून मी सैन्य सोडून जात आहे असे कधी होत नाही त्यामुळे लेखाच्या शीर्षकात मी परमवीर चक्र सर्वांनाच मिळते असे नाही असे लिहिले आहे
हा लेख लिहिण्याचे आज वेगळे कारण आहे साधारणपणे 20 12 साल पासून भारतीय जनता पक्षाकडे इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा लोंढा लागला आहे ज्यांनी आयुष्यभर भारतीय जनता पक्ष व त्याची राष्ट्रवादी विचारसरणी याचा सतत द्वेष केला त्या तथाकथित पुरोगाम्याना भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याबद्दल पुळका येऊ लागला आहे ते भारतीय जनता पक्षातील मूळ कार्यकर्त्यांना पदे मिळत नाहीत सत्ता मिळत नाही बाहेरून येणाऱ्या लोकांना सत्ता मिळते व हे सतरंज्या उचलत राहिले आहेत अशी टीका हे तथाकथित पुरोगामी व कमी समज असणारे भाजप प्रेमी पण करू लागले आहेत
पडेल ते काम मिळेल तो मान
या लोकांच्या हे लक्षात येत नाही भारतीय जनता पक्षामध्ये अगर संघामध्ये जे पूर्वीचे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी मागावयास जात नाही देण्यासाठी जातात आपला पैसा, वेळ, आयुष्य, बुद्धिमत्ता हे देण्यासाठीचे जातात ते काही मिळवण्यासाठी जात नाहीत
सैन्यामध्ये कसे आपल्या वरिष्ठांनी आपण लिहून दिलेले काम सैनिक करत असतात मग त्या कामात मान सन्मान आहे का याचा विचार केला जात नाही त्याप्रमाणेच भारतीय जनता पक्ष व संघ परिवार यामध्ये मला जे काम नेमून गेले आहे ते मी पूर्ण क्षमतेने व तत्परतेने करेन हेच सर्वसामान्य संघ स्वयंसेवक व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करत असतात
सत्ता का सतरंजी
उद्या सैन्यामध्ये ज्याच्याकडे वाहन दुरुस्तीचे काम दिले आहे ते काम न करता मला मला परमवीर चक्र मिळेल असेच काम द्या असा हट्ट करत नाही तसेच भारतीय जनता पक्षाचे व संघाचे कार्यकर्ते या सर्व यंत्रणेतील आपण एक छोटेसे स्क्रु आहोत लहानसे चाक आहोत आपण आपले काम व्यवस्थित केल्यास ही सर्व यंत्रणा व्यवस्थित चालेल व आपले राष्ट्र परम वैभवाकडे नेण्याचे आपले स्वप्न आहे त्यासाठी पडेल ते काम व पडेल ती जबाबदारी घेऊन काम करणे अशी स्पष्ट विचारसरणी घेऊन भाजपचे कार्यकर्ते जगत असतात त्यामुळे त्यांना “सत्ता” का “सतरंजी” हा प्रश्न पडत नाही
आता बाहेरून येणारे नेते व कार्यकर्ते यांना घ्यायचे का नाही तर शंभर टक्के घेतले पाहिजे जेवढे संकट मोठे, जेवढा शत्रु प्रबळ तेवढ्या प्रमाणात सैन्य भरती झालीच पाहिजे
संकट घरात घुसले आहे
ही शत्रुराष्टाची राजकीय चाल साधी व सोपी नाही जगातील अनेक भारत द्वेषाने पछाडलेले लोक ,शक्ती या देशाची कशी विभागणी होईल व हा देश कसा कमकुवत होईल यासाठी आमच्यातीलच देशद्रोही राजकारण्यांना हाताशी धरून मोठा कट शिजवत आहेत
भरती अनिवार्य
हे शांतपणे आलेले परचक्र परतवून लावायचे असले तर सैन्य भरती आवश्यक आहे आणि देशद्रोही समाजद्रोही ताकतीशी लढताना समाजातील सर्व घटक, सर्व पक्षातील चांगले घटक आमच्याकडे आलेच पाहिजेत ते आमच्या सैन्यात भरती झालेच पाहिजेत
सुज्ञ नेतृत्व
ठीक आहे वेळ लागेल आमची शिस्त संयम व विचार त्यांना आत्मसात करायला म्हणून त्याना आमच्याकडे घ्यायचे नाही हा करंटेपणा भाजपचे नेतृत्व करणार नाही व त्यांनी करू नये
देणे श्रेष्ठ की घेणे
ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपणास काही मिळाले नाही अशी खंत वाटत असेल तर त्यांनी मिळवण्यासाठी आपण भाजपमध्ये आगर संघामध्ये गेलेलो नव्हतो आपण देण्यासाठी आलेलो आहोत त्याची खूण गाठ मनाशी बाळगावी
(प्रासंगिक)

ॲड अनिल रुईकर
98 232 550 49
इचलकरंजी

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button