केजरी के कारनामे
केजरी के कारनामे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 15/02/2024 :
ज्यावेळी फक्त दूरदर्शन सुरू होते त्यावेळी मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणून एक मालिका गाजली होती तसे आता केजरी के कारनामे म्हणून एखादी मालिका निर्माण होण्याची वेळ आली आहे
ढगळ शर्ट आणि पायात हवाई चप्पल अशा अवतारात केजरीवाल कायम दिसत असतो व आपल्या साधेपणाची जाहिरात करत असतो काही वेळा रिक्षातून फिरतो व काही वेळा दुचाकीवरून फिरतो या देशातील सरळ मार्गी गोरगरीब जनतेला फसवण्याचा केजरी आणि कंपनी यांचा मोठा डाव सुरू आहे
तीन हजार रुपये लिटरचे पाणी
22 साठी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे महाशय 40 दिवस गुजरात मध्ये जाऊन राहिले होते एका प्रांताचे मुख्यमंत्री असल्याने त्यांना गुजरात मध्ये सरकारी गेस्ट हाऊस उपलब्ध झाली असती अगर एखाद्या धनीक कार्यकर्त्यांच्या घरी ते राहू शकले असते पण
यांनी असे न करता पण पंच तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठेवला या पंचतारांकित हॉटेलचे भाडे एका सूटचे दिवसाला दहा लाख रुपये पेक्षा अधिक होते हे निवासस्थान म्हणजे एखाद्या राजमहाला लाजवेल असे होते त्यांचे पाण्याच्या बाटलीचा दर तीन हजार रुपये होता
हे सर्व प्रचंड खर्च दिल्ली सरकारच्या कोषागृहातून खर्च झाला काय किंवा कोणी भ्रष्टाचारी उद्योगपतीने केला काय हा संशोधनाचा विषय आहे या महाशयांच्या बरोबर त्यांची मंत्री मंडळातील आठ दहा पुढार्यांची टीम पण असा पंचतारांकित खर्च करत गुजरात मध्ये प्रचारासाठी राहिले होते
चौकड्याचा ढगळ शर्ट व पायात हवाई चप्पल घालून आपल्या साधेपणाची जाहिरात करणारा असा पुढारी या देशाने पूर्वी कधी पाहिला नसेल
असेही लोकप्रतिनिधी होते
महाराष्ट्रात पूर्वी रवींद्र सबनीस ,त्रंबक कारखानिस रामभाऊ म्हाळगी, केशवराव घोंगडे असे एकापेक्षा एक विधानसभेतील कार्यक्षम आमदार होऊन गेले यांचे साधेपणा महाराष्ट्र विसरू शकणार नाही इतकेच काय मी इचलकरंजीचे आमदार कै बाबासाहेब खंजीरे यांना इचलकरंजी ते मुंबई एसटीने प्रवास करताना पाहिले आहे माजी महसूल मंत्री उत्तमराव पाटील यांना फुटक्या आरशामध्ये दाढी करताना पाहिले आहे
साधेपणा इतिहास जमा
असे लोकप्रतिनिधी आपल्या देशात आता इतिहास जमा झाले आहेत चंगळवादी व सरकारी पैशावर रुबाब दाखवणारे लोकप्रतिनिधी आता आहेत
पण केजरीची कथाच न्यारी
साधेपणाचा आव आणून पंचतारांकित अय्याशी करणारा चौकड्याचा ढगळ शर्ट घालून वावरणारा असा लबाड लांडगा पुन्हा होणे नाही
आता लवकरच चौकड्याचे कपडे व चौकड्याची टोपी घालण्याची वेळ येणार आहे
आणखीन एक कारनामा
या केजरी कंपनीने दिल्लीतील हायकोर्टाची जागा अतिक्रमित करून त्यावर आम आदमी पक्षाचे कार्यालय उभे केले आहे व यासाठी कॅबिनेटचा ठराव केलेला आहे
तोंडात बोट
इतके दिवस अतिक्रमणांचे विरुद्ध सतत सक्त निकाल देणाऱ्या मा.सर्वोच्च न्यायालयाने हा केजरीचा कारनामा पाहून तोंडात बोट घातले असेल आणि हे असे पुढारी देशातील सर्वोच्च सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत
(प्रासंगिक )
ॲड अनील रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी