पवारसाहेबांच्या खिळखिळ्या झालेल्या मोकळ्या हवेलीतून ज्ञानेश्वर आगाशे

पवारसाहेबांच्या खिळखिळ्या झालेल्या मोकळ्या हवेलीतून ज्ञानेश्वर आगाशे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 17/02/2024 :
सध्या राज्यात आणि देशात राजकारण टिपेला पोचलेल असताना मध्येच कुठे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे दिवंगत माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर आगाशे यांच शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांच्या बाबतीत आता हे नवीन काय ॽ असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे पण काय आहे नियती आपला सारा खेळ खेळूनच आपल्या जंत्रीची गाठ बांधते मग तो राजा असो अथवा राजकारणाला तालावर नाचवणारे शरदचंद्र पवारसाहेब असो सगळ्यांना न्याय एकच म्हणून म्हणतात या जन्मी केलेल्या प्रत्येक पुण्याचा आणि पापाचा हिशोब चोख असतोच तेच तर नियतीच काम आहे .
महाराष्ट्रातील विशेषतः बारामतीच्या लोकसभा निवडणूकीच काका शरदचंद्र पवारसाहेब आणि पुतण्या अजितदादा पवार यांच राजकारण कालपासून चांगलंच टिपेला पोहोचल आहे यात काका बाजी मारतात का ॽ का पुतण्या त्यांना निकाली कुस्तीचा फड जिंकून आसमंत दाखवतो हे पाहणं अतिशय चित्तथरारक असणार आहे , कारण या काका पुतण्याने आजपर्यंत महाराष्ट्रातील लोकांना विशेषतः त्यांच्या चांडाळातील चौकडीला ऐनकेन प्रकारे राजरोसपणे आपल्या तालावर नाचवून राज्याचा रथ एक वर्ष चालेल इतका माल हापसला असल्याचे बोलले जाते त्यामुळे आता मतदारांनी लक्ष्मी दर्शन घेतल्याशिवाय अजिबात मतदान केंद्राचे तोंड पाहणार नसल्याचा अघोषित निर्णय घेतला आहे अर्थात त्यात काय नवीन नाही .
कालपासून बारामतीच्या परिसरात काका पूर्वेला तर पुतण्या पश्चिमेला प्रदक्षिणा मारत मतदारांचा कौल अजमावत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यात पुतण्याने काकांचा हिशोब चुकता करण्याची खांडकी सुपारी भाजपकडून वाजवायला सुरुवात केली आहे त्यामुळे काकांची साठ वर्षांतील साचलेली सत्तेची साठमारी आता या निवडणुकीत एकदाशी बाहेर निघणार आहे यात काही शंका नाही अर्थात काका आपल्या पुतण्याचा कार्यक्रम नक्की कसा करणार हे अजून अधोरेखित व्हायचं आहे असो , तर मुळ मुद्दा नियतीचा आहे त्यामुळे या पवार कुटुंबातील कलह आज ना उद्या बाहेर येणारच होता कारण या कुटुंबातील सदस्यांनी सत्तेच्या मगरमिठीत राहून अनेकांना नाहक केवळ सुडापोटी नागवले आहे त्याचाच तर हिशोब निवडणूकीच्या माध्यमातून नियती मागते आहे इतकंच नाही तर ती आता हिशोब पुरता घेतल्याशिवाय परतीच्या वाटेला सुध्दा जुमानणार नाही .
तर त्यातले दोन हिशोब मांडायचा माझा प्रयत्न आहे पहिला आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे दिवंगत माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर आगाशे यांच्या संदर्भातील तो असा की शरदचंद्र पवारसाहेब हे भारतीय क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जगमोहन दालमिया यांच्याकडून ज्ञानेश्वर आगाशे यांच्यामुळे केवळ एका मताने पराभूत झाले , तो पराभव ते पचवू शकले नाहीत म्हणून त्यांनी केवळ सूडापोटी पेटून उठून (त्यावेळी आगाशे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते ) आगाशे यांच्या अखत्यारीतील सुवर्णा सहकारी बँक डबघाईला आणण्यासाठी नाना क्लुप्त्या लढवत बॅंकेतील ठेवीदारांवर दबाव आणून त्यांना त्यांच्या ठेवी अचानकपणे काढण्यासाठी भाग पाडले त्यामुळे बॅंक डबऱ्यात गेली आणि अध्यक्ष म्हणून आगाशे तुरुंगात खितपत पडले .
आता आगाशेंना मुळापासून उखडून टाकण्याचा चंगच बांधला गेल्याने माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या आगाशे यांच्या नावे पुण्या प्रमाणे श्रीपूर येथील महाविद्यालयाला टाळ ठोकल हे काय कमी होतं म्हणून आगाशे हे ब्रहन महाराष्ट्र शुगर सिंडीकेटचे अध्यक्ष होते त्याच बरोबर त्यांची स्वतःची डिस्टीलरी होती त्यावर सुद्धा वरवंटा फिरवला गेला . बॅंक , डिस्टीलरी , दोन महाविद्यालये , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच अध्यक्षपद आणि स्वतःच्या खाजगी साखर कारखाना आणि त्या अंतर्गत असलेली रेल्वे लाईन सर्व काही उध्दवस्त व पुन्हा त्यात आगाशे मोठे जमीनदार असताना या आगाशेंना शेवटी शेवटी याच राजकारणातील कर्मवीराने पुण्यातील खासगी रुग्णालयात साधे उपचार सुध्दा होऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेतली म्हणून आगाशेंचा अखेर पुण्यातील ससून रुग्णालयात झाला , बर इतकं सार होऊन सुध्दा कर्मवीर शांत झाले नाहीत तर त्यांनी आगाशेंचा मुलगा आशुतोष याच्या क्रिकेट करिअरवर कायमची गदा आणली आता बोला .
जी दुरावस्था ज्ञानेश्वर आगाशे यांची झाली त्यापेक्षा वेगळी अवस्था पुण्यातील कधीकाळी शिखरावर असणाऱ्या डीएसके अर्थात धनंजय सखाराम कुलकर्णी यांची नाही हां फक्त ते आजही येरवडा कारागृहात जिवंत आहेत इतकेच , काय तर डीएसकेंनी ‘ लवासा ‘ सारखा गृह निर्माण प्रकल्प उभा करण्याचा चंग बांधला त्यातून पवार कुटुंबातील सदस्यां व्यतिरिक्त दुसरा कुणी मोठाच होता कामा नये या असूरी पिढेतून डीएसकेंच माॅडेल पुण्यातील येरवडा कारागृहात मागील अनेक वर्षांपासून खितपत पडल आहे !ना त्यांना जामीन मिळत ना त्यांच्यावर असलेल्या आरोपांची सुनावणी होत त्यामुळे इथून तिथून सगळं एकजात कसं मॅनेज केले जाते याच हे उत्तम उदाहरण आहे , मग त्यावेळी कोणती अद्रुश शक्ती काम करते हे काय नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही परिणामी नियती आता या सगळ्याचा हिशोब मागते आहे अर्थात पध्दत वेगळी इतकंच असो.
राजाभाऊ त्रिगुणे
दिनांक – १७/२/२०२४ .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक