निखिल वागळे टोळी आता मविआच्या दावणीला

निखिल वागळे टोळी आता मविआच्या दावणीला
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 11/02/2024 : निखिल वागळे टोळी आता मविआच्या दावणीला हो खरंच आहे कारण एक दशकापूर्वी शिवसेनेला विशेषतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत त्यांच्यावर वायफळ शब्दांतून लाखोली वाहणारे पत्रकार निखिल वागळे यांनी मागील चार वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुपारी वाजवायला सुरुवात केली आहे.आता या सुपारीला कापण्यासाठी अडकित्ता असायला हवा म्हणून याच वागळेंनी पुण्यातील दोन जातिवंत धर्मनिरपेक्ष असण्याचा बहाणा करून आपली दुकानदारी चालवणारे असिम सरोदे व विश्वंभर चौधरी यांना हाताशी धरून आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली जो काही हैदोस घालायला सुरुवात केली आहे याचा अर्थ या तिकडम अती शहाण्यांनी महाविकास आघाडीच्या नावाने लाखोंची बिदागी घेतली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्यात तथ्य किती हा भाग वेगळा आहे.
पत्रकार निखिल वागळे हे स्वतःला इतरांपेक्षा अती शहाणे समजतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच जातकुळीतील असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांना हाताशी धरून आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने विविध ठिकाणी सभा घेऊन भाजपला विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिव्याशाप देण्याचा रतीब घालायला सुरुवात केली आहे.अर्थात या तिकडम लोकांना गल्ली बोळातली पोरठोर सुध्दा ओळखत नाहीत. तरीपण आपण कसे अती शहाणे आहोत आणि केंद्रातील मोदी सरकार यांची कशी मुस्कटदाबी करतयं असा हिंदु विरोधी एकमुखी अजेंडा राबविण्यासाठी शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांच्याकडून बिदागी घेऊन भाजपच्या नावाने शंख फुंकायला सुरूवात केली आहे. वास्तविक त्यांनी हे सर्व करताना आपली ओरिजनल जातकुळी दाखवत भाषेचा स्तर इतका खालच्या पातळीवर आणला म्हणून तर या वागळेची पुणेकरांनी अक्षरशः वाकळ करून त्यांच्या गाडीची गोधडी केली. हे कशाचे द्योतक आहे .निखिल वागळे हे दैनिक महानगरचे संपादक असताना आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली जो त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राजरोसपणे गरळ ओकताना गलिच्छ भाषेत जे लिखाण केले, त्यामुळे अर्धा डझनवेळा महानगरच कार्यालय शिवसैनिकांनी फोडल. पण यात हे वागळे सातत्याने का बचावले हेच कळत नाही. कारण त्यांना यातून फक्त महानगरचा खप वाढवायचा होता याविषयी सखोल लिखाण त्यावेळचे त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी व आताचे आमदार कपिल पाटील यांनी त्यांच्या आज दिनांक या सांय दैनिकात वेळोवेळी केल आहे यात भरपूर प्रमाणात तथ्य आहे. कारण या माणसाला सतत ऐनकेन प्रकारे प्रकाश झोतात राहायची सवय आहे. त्यानंतर अगदी पंधरा वर्षांच्या आसपास हेच वागळे ज्यावेळी आयबीएन लोकमत या वाहिनीचे संपादक असताना विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी अशाच एका प्रकरणातून विक्रोळीच्या कार्यालयाचा खळखटयाक केला होता हे काय नवीन नाही. पण याचं सोयरसुतक ना उध्दव ठाकरे यांना आहे ना खासदार संजय राऊत यांना. त्यामुळे भाजपची नाहक बदनामी करण्यासाठी या संपुष्टात येत असलेल्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नावाने या तिकडम वागळे टोळीला सुपारी दिली आहे. त्यामुळे तर त्यांची दुकानदारी जोर पकडत गावोगावी भुंकण्याचा एककलमी कार्यक्रम याच पैशातून करत आहे.नाही तर या सगळ्या गोष्टींचा खर्च कोण करत याचा जाणकारांनी शोध घ्यावा. अर्थात या भुंकणाऱ्यांना वारेमाप भुंकत ठेवलं तर साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणखी वाढेल. आणि ‘ अब की बार चारसो पार ‘ चा नारा यशस्वी होण्यासाठी भाजपला वेगळी प्रचार यंत्रणा उभी करण्याची अजिबात गरज नाही. अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत जसे हाडा मासाचे शिवसैनिक होते तसेच आताच्या काळात देशभक्तीने प्रेरित झालेले मोदी सैनिक आहेत हे या वागळे टोळीने विसरू नये परिणामी त्यांनी भाषेवर नियंत्रण ठेवावे अन्यथा…
राजाभाऊ त्रिगुणे
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक