शेळ्या मेंढपाळानी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा. संजय वाघमोडे
यशवंत क्रांती संघटनेच्या प्रयत्नांना यश.

शेळ्या मेंढपाळानी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा-संजय वाघमोडे
यशवंत क्रांती संघटनेच्या प्रयत्नांना यश.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 11/02/2024 :
शेळ्या-मेंढपाळांचा किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्यात आला असून या योजने अतर्गत शेळ्या-मेंढपाळ यांना १ लाख १० हजार रुपये पर्यंत अल्प मुदतीचे कर्ज (खेळते भागभांडवल) मिळणार आहेत. या कर्जास व्याज परतावाही मिळणार आहे. तरी या योजनेचा लाभ शेळ्या-मेंढपाळांनी घ्यावा. असे आवाहन संजय वाघमोडे यांनी केले.ते यशवंत क्रांती संघटना शाखा शेंडूर ता कागल जि. कोल्हापूर येथे संघटनेच्या शाखा वर्धापनदिनामित्त आयोजित मेंढपाळ मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पशुधन अधिकारी डॉ लुद्रीक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.
बोलताना पुढे म्हणाले की शेळ्या मेंढपाळ मेंढपाळांना खेळते भाग भांडवल कर्ज स्वरूपात शासनाकडून मिळावे, यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार नाबार्ड व राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडे यशवंत क्रांती च्या माध्यमातून सतत पाठपुरावा सुरू होता. केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन २४ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने परिपत्रक काढून शेळ्या मेंढपाळांना ही अल्पमुदतीचे कर्ज (खेळते भाग भांडवल) देण्याबाबत परिपत्रक काढले. इतर राज्यात या योजनेचा लाभ दिला परंतु महाराष्ट्रातील बँक व प्रशासनाची उदासीनता यामुळे शेळ्या मेंढपाळ यांना लाभ मिळाला नाही. संघटनेच्या पाठपुराव्यामुळे योजनेचा लाभ शेळ्या मेंढपाळ यांना देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली . या योजनेसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, लाईट बिल, व सातबारा तसेच शेळ्या मेंढ्या असल्याबाबत शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक असतील. तसेच या योजनेतून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास केंद्र सरकारकडून तीन टक्के व राज्य सरकारकडून एक टक्का व्याज परतावा मिळणार आहे. तरी शेळ्या-मेंढपाळानी या योजनेचा फायदा घ्यावा.
बँका मेंढपाळांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत होत्या त्यामुळे मेंढपाळांना आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी खाजगी सावकाराकडूनच पंधरा ते वीस टक्के व्याजाने कर्ज घ्यावे लागत होते. त्यामुळे मिळणारे उत्पन्न सावकारी कर्ज फेडण्यात जात होते. मेंढपाळाच्या हाती काही शिल्लक राहत नव्हते. या योजनेमुळे मेंढपाळांनी आता आर्थिक गरजा भागवण्यासाठी सावकारी कर्ज काढणे ऐवजी किसान कार्ड योजनेचा लाभ फायदा घ्यावा. डॉ. लुद्रिक, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आप्पाजी मेटकर , मेंढपाळ अवघडी व्हन्नुरे , म्हाळु बंडगर संभाजी हजारे , म्हाळु बंडगर, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. लुद्रिक यांनी मेंढ्यांच्या आजार व घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली . शेळ्या मेंढ्यांची लसीकरण वेळेनुसार करावे तसेच चांगल्या पैदासीसाठी कळपातील नर मेंढा दोन वर्षानंतर बदलण्यात यावा दोन वर्षांनी नर मेंढा बदलल्यास पैदास झालेल्या पिलांची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते. तसेच दवाखान्यात पीपीआर ची लस उपलब्ध आहे. तसेच शेळ्या मेंढ्यांना कोणताही आजार झाल्यास इतर उपाय न करता जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी केले.
कृष्णा शिवाजी झेंडे (माजी सैनिक) यांची यशवंत क्रांती संघटना कागल तालुका संपर्क प्रमुखपदी, तर कागल तालुका अध्यक्षपदी आनंदा विठ्ठल धनगर यांची निवड करण्यात येऊन त्यांना निवड पत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास आप्पाजी मेटकर उपाध्यक्ष अमोल मेटकर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर जिल्हा संघटक सचिन लांडगे कांडगाव, तालुका प्रसिद्ध प्रमुख संदीप धनगर, शेंदूर शाखाध्यक्ष राजाराम हजारे, राजाराम हजारे, शिवाजी गोरडे, सुऱ्याप्पा बंडगर, बाबासाहेब बंडगर, रामा गोरडे,भगवान बंडगर, अवघडी हजारे, शिंगाडी बंडगर, बाळू बंडगर, कृष्णात बंडगर, सात्ताप्पा बंडगर, सागर गोरडे, सागर शेळके, बाळू शेळके,कृष्णात वास्कर,बिरू गोरडे, तुकाराम गोरडे, मंगेश गोरडे,कृष्णात व्हन्नुरे, राघू बंडगर,आप्पाजी हजारे, सुरेश शेळके, म्हाळु गोरडे,अवघडी बंडगर व शाखेचे सर्व पदाधिकारी एम के बाणगे हुन्नूर, कोथळी तसेच परिसरातील मेंढपाळ व शेंडूर येथील मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवघडी सुऱ्याप्पा शेळके यांनी केले.