तानाजी धरणे यांच्या “हेलपाटा” कादंबरीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाड्:मय पुरस्कार 2024 जाहीर …

तानाजी धरणे यांच्या “हेलपाटा” कादंबरीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाड्:मय पुरस्कार 2024 जाहीर …
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 9/02/2024 :
मातंग साहित्य परिषद, पुणे यांचा,लेखक तानाजी धरणे यांच्या “हेलपाटा” कादंबरीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाड्:मय पुरस्कार 2024 जाहीर झाल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.धनंजय भिसे यांनी जाहीर केले आहे .
साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचा असा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य वाड्:मय पुरस्कार येत्या 11 फेब्रुवारी 2024 रोजी दुसर्या मातंगऋषी साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे संमेलनाध्यक्ष व शंकरशेठ जगताप स्वागताध्यक्ष यांचे उपस्थितीत देण्यात येणार आहे . सदरचे साहित्य संमेलन ‘ राजवाडा लाॅन्स’ काळेवाडी पिंपरी येथे संपन्न होईल.
“हेलपाटा” कादंबरीला या वर्षातला हा तिसरा अतिशय मानाचा पुरस्कार प्राप्त झाला असुन यापुर्वी ‘ जामनेर येथिल साहित्य संस्कृती मंडळ जामनेर यांचा उत्कृष्ट कादंबरी व संत सावता माळी साहित्य मंडळ वरुड अमरावती यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला आहे .या पुरस्कारामुळे सर्वत्र “हेलपाटा” कादंबरीचे कौतुक होत असुन “हेलपाटा” कादंबरीकार तानाजी बबनराव धरणे( ग्रामविकास अधिकारी महाड रायगड, मुळगाव आंबळे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे) यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता तसेच अकलूज वैभव डॉट इन aklujvaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (महाराष्ट्र प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी (पिछडा आयोग दिल्ली) यांनी भ्रमणध्वनी वरून कादंबरीकार तानाजीराव धरणे यांचे अभिनंदन करून “संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरी जनमाणसात अढळस्थान निर्माण करेल, करावी”. अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.