ताज्या घडामोडी

अफवा आणि विरोधकांची रणनीती या पासून मोहिते पाटील समर्थकानी सावध राहण्याची गरज

अफवा आणि विरोधकांची रणनीती या पासून मोहिते पाटील समर्थकानी सावध राहण्याची गरज

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 10/02/2024 :
2024 लोकसभा निवडणुका वेशीवर आलेल्या आहेत.आणि या निवडणुका लढवण्यासाठी अनेक इच्छुक हे असणार आहेत.प्रस्थापित पक्षाची उमेदवारी मिळवण्या साठी त्या त्या पक्षाअंतर्गत स्पर्धा ही असणे स्वाभाविक आहे. आणि या मुळेच ते तिकीट प्राप्त करण्यासाठी आपापली ताकद प्रत्येक उमेदवार लावत असतो. आणि आपलीच उमेदवारी ही फिक्स करण्यासाठी इतरांचा पत्ता साफ करण्या साठी ही अफवा पसरवून पक्षांतर्गत असलेली स्पर्धा मधून इतरांना बाहेर काढण्याची ही रणनीती आखली जाते.आणि याचा परिणाम कळत नकळत प्रतिस्पर्धी गटाच्या नेत्यांच्या , त्यांच्या पाठिराखांच्या मनावर होऊन संभ्रम निर्माण होत राहतात.
असे संभ्रम,किंतू परंतु , आपल्यात राहू नयेत म्हणून ते कोण पसरवत आहेत ? ते आपले मित्र , हितचिंतक , की छुपे शत्रू , आहेत ? हे तपासून पाहण्याची ही आवश्यकता असते.
निवडणूक काळात भलतेच उदार मतवादी बनून पक्षनिष्ठा दर्शवून पक्ष जो उमेदवारी देईल त्यांचा आम्ही प्रचार करू असे उच्चारवाने बोलणारे नेते ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपापल्या उमेदवारी चां अजेंडा राबवत पुढे सरकत असतात.त्या साठी त्यांची धावपळ जुने नवे मित्र , राजकीय पटलावरतील नेते मंडळी यांच्या कडे चालू राहते. आणि यातून नव्या नव्या बातम्या पसरत असतात.
काल दिनांक 9/1/2024रोजी पंढरपूर येथील एका युट्यूब वरील वृत्त चॅनल ने माजी आमदार प्रशांत जी परिचारक यांची मुलाखत दाखवली.या मुलाखती दरम्यान त्यांचे जवळच विद्यमान खा. रणजितसिंह निंबाळकर ही उभे होते. आणि पत्रकारांना मी अधिकृत माहिती देत आहे की, मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यातील वाद मिटला असून तो देवेंद्र फडणवीस यांनी मिटवला आहे. त्या नंतर आम्ही सर्वांनी एकत्रित जेवण घेतले. हे सांगून खा. रणजितसिंह निंबाळकर हे कसे टॉप टेन मध्ये आहेत.त्यांचे कार्ड मजबूत आहे याचे रसभरीत वर्णन चालू केले.
हे वार्तांकन पाहत असताना मला हेच जाणवले की , कांहीं व्यक्ती ह्या स्वतःला बदलवून घेतच नसतात ,
आपण फार मोठे रणनितीकार आहोत,आणि आपण पडद्या आडून सर्व सूत्रे हलवून कायम स्वरुपी मोहिते पाटील यांना राजकीय पटलावरून बेदखल करू शकतो असा त्यांचा आविर्भाव असतो.
आ. प्रशांत परिचारक यांना आम्ही या लेखा द्वारे विनंती करतो की , तुम्हाला खरोखर पक्षनिष्ठा आणि भाजपा प्रति प्रेम असेल तर पूर्वीचे खोडसाळ आणि कुरघोडी चे राजकारण बाजूला ठेवा, खुल्या दिलाने आणि खुल्या मनाने पक्षाचे हितासाठी जे जे आवश्यक असेल ते ते करा , किंवा फार तर तटस्थ रहा ,,,
सोलापूर जिल्ह्याची राजकीय मोळी एक संघ असताना प्रशांत परिचारक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी तुम्ही मोहिते पाटील यांच्या विरोधात जी रणनीती यशवंत सभागृह येथे खेळत होतात त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आम्ही आहोत. त्या काळात युवक वर्गात असणाऱ्या आ. संजय शिंदे , रश्मी बागल , विजयराज डोंगरे या सर्वांचे मार्गदर्शक गुरू म्हणून तुम्ही भूमिका बजावत होता.
2009साली माढा विधानसभे साठी आदरणीय विजयदादा यांनी रणशिंग फुंकलेले असताना त्यांना समेट करून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी जागा तुमच्या काकांनी म्हणजेच राजकारणातील संत म्हणून ओळख असलेल्या वै. श्रीमंत सुधाकरपंत यांनी देऊ केली. ते सर्वासाठी आदरणीय होते , पण त्यांच्या या उदार मतवादी भूमिकेचा ही सन्मान तुम्ही राखला नाही. उमेदवारी दाखल करण्या पूर्वी तुमच्या समर्थका करवी थेट आत्मदहन सारखी नाट्यमय घटना , पंढरपूर बंद सारखे प्रयोग राबवले गेले.
पंढरपूर राजकीय गुलामीत ढकलायचे का? , ते घाटाची रस्त्याची नावे ही बदलतील इतका विषारी प्रचार करणारी पत्रके वाटण्यात आली.
पक्ष बाजूला ठेऊन पक्षातील वरिष्ठांनी आणि तुम्ही ही अपक्ष उमेदवारास निवडून आणण्यास मदत केली.
त्या सर्व जखमा तुमच्या या मुलाखती ने पुन्हा ताज्या केल्या.
ही घडून गेलेली बाब भाजपातील नेतृत्वाला ज्ञात नसते. ज्यांची दिशाभूल तुमच्या सारखे लोक करू शकतात.
पण यातून तुम्ही तरी काय साध्य केले? याचे ही आत्मपरीक्षण करा.
पक्ष त्याग आणि दिलेला शब्द व त्याची किंमत मोजण्याची तयारी ठेवणारे मोहिते पाटील यांचा हा गुण तुम्हाला घेता आला तर अवश्य घ्या.

मोहिते पाटील यांच्या नाका पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस ने पाणी आणल्या नंतर आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेस कोणताच सकारात्मक प्रतिसाद न मिळता उलट कृष्णा काठच्या लोकांना चिथावणी देऊन योजनेला ही विरोध केला जात आहे असे दिसल्या नंतर भाजपा मध्ये विना शर्थ प्रवेश केल्या नंतर कोणतीही खळखळ न करता मोहिते पाटील यांनी माळशिरस विधानसभा (राखीव) आणि माढा लोकसभा मतदार संघात पक्ष देईल तो उमेदवार मनापासून स्वीकारला.
सच्चाई आणि ईमानदारी या पेक्षा कट कारस्थनाची बाब राजकारणात प्रभावी ठरेल असे त्यांनी मनात ही आणले नव्हते. पण गटबाजीचे राजकारण सुरू करून मोहिते पाटलांच्या पूर्वाश्रमीच्या सर्व विरोधकांची मोट बांधून मोहिते पाटील यांना संसदीय राजकारणातून खड्यासारखे बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यांनी हे ही लक्षात ठेवावे की, मोहिते पाटील म्हणजे तांदळा तील निष्क्रिय खडे नाहीत की त्यांना कोणी ही चिमटीत धरून संसदीय राजकारणाच्या ताटातून बाहेर फेकून देऊ शकेल.
आई अकलाई ची कृपा आणि शंभु महादेवाची कृपा लाभलेलं हे घराणे आहे. सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , सांस्कृतिक , कृषी , क्रीडा या सर्वांवर पकड असणारे आणि लाखो लोकांच्या ह्रुदयात ज्यांचा निवास आहे अस हे नेतृत्व आहे.
आदरणीय विजयदादा हे जुन्या काळातील संयमी नेतृत्व , त्यांना असल्या राजकीय कुरघोडी चां फारसा अनुभव ही नव्हता , आणि आवड ही नव्हती , पण
राजकारणात जे जे आवश्यक असते , ते ते करण्याची आणि प्रत्येक कुरघोडी ला जश्यास तसे उत्तर देण्याची क्षमता ही धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या अंगी आहे.आणि हे रसायन काय आहे याची कदाचित तुम्हास तितकीशी जाणं नसेल
असो. दुसरा संभ्रम हा पसरवला जात आहे की मोहिते पाटील निवडणूक लढवतील का? की मागच्या दाराने भविष्यातील मंत्रिमंडळ समावेश करण्याच्या अटीवर ते समझोता करतील ?
एक पौराणिक कथे नुसार धर्म राजा भोजना साठी बसलेला असताना एक याचक दान मागण्यासाठी येतो तेंव्हा उद्या ये असे धर्म राज म्हणतो , तेंव्हा तो याचक हसतो.
राजा तू जो घास खात आहेस तोही पोटात जाईल की नाही याची ही शाश्वती देता येत नाही.
आणि तू उद्याची बात करतोस ?
संसदीय राजकारणात जर तर , उद्या परवा याला काडी इतका ही अर्थ नसतो.
मोहिते पाटील का नकोत ? याचे उत्तर जनता व मोहिते पाटील समर्थक मागत आहेत.
जे काल ही आमच्या विरोधात होते. आज ही विरोधात राहतील.पण त्यांना पुढे करून या पुढे आमच्या मोहिते पाटील यांना डावलले जाईल ते मात्र आम्ही मोहिते पाटील समर्थक म्हणून खपवून घेणार नाही.
“ज्याला शत्रू नाही तो मर्द नसतो ”
अस निस्ते नावाचा ग्रीक विचारवंत म्हणतो ,
आम्हाला शत्रू आहेत , आणि आमच्या शत्रूला ही शत्रू आहेत , ही बाब विसरू नका , राजकारणात त्यांना मित्र गोळा करता येतात आणि आम्ही काय दगडे गोळा करत फिरतो काय?
म्हणून मोहिते पाटील समर्थकांना मी एकच विनंती करून सांगेन की असले मागच्या दरवाजाचे पर्याय आपण बंद केले आहेत.आत्ता मैदानात उतरायचे च आहे ही बाब नीच्छित आहे.
अफवा , संभ्रम , या जाळ्यात न अडकता आपल्या मनगटावर , आणि आपल्या मेंदूचे क्षमतेवर विश्वास ठेवा.
आपल्या धैर्यशिलजी मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला पराभूत करू शकेल असा “माय का लाल” अजून पैदा झालेले नाहीत.
जय हिंद ,,,, जय महाराष्ट्र ,,,, जय श्रीराम , जय भवानी ,,,,, जय शिवराय ,,,, जय अहिल्या,,,,, जयभीम ,,,

ऍड अविनाश टी काले
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
मो न :- 9960178213
~~~~~~~~~~~~~~~~~~

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button