ताज्या घडामोडी

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय व बीव्हीजी इंडिया लिमिटेड मध्ये सामंजस्य करार

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय व बीव्हीजी इंडिया लिमिटेड मध्ये सामंजस्य करार

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 04/01/2024 : सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च, शंकरनगरअकलूज अभियांत्रिकी महाविद्यालय व हिंजवडी, पुणे येथील बीव्हीजी इंडिया लिमिटेड या संस्थांमध्ये प्लेसमेंट, इंटर्नशिप व ट्रेनिंग या गोष्टींसाठी सामंजस्य करार संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी संपन्न झालेल्या सामंजस्य करारा बाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले कि, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच औद्योगिक प्रशिक्षण व इंटर्नशिप हे देखील गरजेचे आहे. सदर सामंजस्य करारांतर्गत, बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनी मार्फत विद्यार्थ्यांच्या एकूण जडघडणीत तसेच नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, व उद्योजकता विकास यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनी महाविद्यालयासोबत “प्रायोरिटी प्लेसमेंट पार्टनर” म्हणून कार्यरत असणार आहे. या संधीचा लाभ महाविद्यालयातील पदवी व पदविका अभियांत्रिकी मधील सर्व विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
सदर कार्यक्रमावेळी बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे चेअरमन व मॅनेजिंग डिरेक्टर हनुमंत गायकवाड, प्लेसमेंट प्रमुख रवी घाटे, रुपल सिन्हा, तसेच सर्व विभागप्रमुख व एचआर समिती, मा.टीपीओ समन्वयक शीतलकुमार रवंदळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर योगेश शेटे आदी उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.