ताज्या घडामोडी

10 ते 12 जानेवारीस महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे सांगलीत अधिवेशन

10 ते 12 जानेवारीस महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे सांगलीत अधिवेशन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 03/01/2024 :
महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, इंटिग्रेटेड सोशल मीडिया प्रोफेशनल ( लखनौ) आणि शांतिनिकेतन लोकशिक्षण विद्यापीठ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10,11 व 12 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय स्तरावर अधिवेशन आयोजित केले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कुंभार यांनी पत्रकारांना दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष समाप्ती प्रसंगी राष्ट्रीय जाणीवेने स्वातंत्र्य वीरांच्या संकल्पनेतील सुराज्य प्राप्तीसाठी रचनात्मक कार्य उभारणीस ठोस चालना मिळावी यासाठी तज्ञांचे मार्गदर्शनाखाली विचार मंथनातून देशात प्रक्रिया सुरू करावी व त्यासाठी शहिदांच्या स्वातंत्र्याच्या बलिदानाच्या प्रेरणेने रयतेच्या सुखा समाधानासाठी ‘ कचऱ्याचे शास्त्रीय नियोजन ‘ या विषयावर देशातील अनेक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना निमंत्रित करून सदर अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. घटनेतील मूलभूत अधिकारांपैकी महत्वाचा घटक म्हणजे सकस अन्न. ते जर रयतेला मिळाले तर सुखात मोलाची भर पडेल. अन्न निर्माण करणाऱ्या गृहिणी स्वयंपाकासाठीच्या एल. पी. जी. गॅस सिलिंडर बाबत दु:खी आहेत. शेतामधील जहरयुक्त व निकृष्ट अन्न सेवनाने तरूण वयात निर्माण होणाऱ्या व्याधी व पूर्वजांच्या तुलनेने शारिरीक कमकुवतयुक्त पिढी या जटिल समस्या उद्भवलेल्या आहेत. त्यावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ शरद काळे ( पद्मश्री) व दिगंबर पाटकर ( गारगोटी जि. कोल्हापूर ) यांनी यशस्वीपणे प्रकल्प साकारलेले आहेत व हे प्रकल्प तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची धडपड आहे. घरच्याघरी कचरा व संडासपासून विद्युत, उर्जा, गॅस, व सेंद्रिय व नैसर्गिक खतांच्या निर्मितीने स्वयंपाक गॅस बाबत स्वावलंबन व रासायनिक खते व विषारी किटक नाशकांपासून भुमीला मुक्तीने सकस अन्नधान्य उत्पादनाने आरोग्य संपन्नतेची पिढी ही चळवळ साकारणे या ध्येयाने हे अधिवेशन आयोजित केले आहे. दि. 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता या विषयावर लिहिलेल्या लेखांच्या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याने अधिवेशनाचा शुभारंभ होणार असून शिवाजी विद्यापीठाच्या सातारा उपकेंद्राचे अध्यक्ष लाल बहादूर शास्त्री कॉलेज सातारा चे प्राचार्य मा. डॉ. शेजवल, ज्येष्ठ विचारवंत यशवंत पाटणे, शांतिनिकेतन लोकशिक्षण विद्यापीठाचे संचालक गौतम पाटील, दिगंबर पाटकर, इंटिग्रेटेड सोशल मीडिया प्रोफेशनल चेअरमन चंद्रशेखर राव ( लखनौ) पर्यावरण तज्ञ कौशलनाथ मिश्रा, भांडेकर वर्धा, कोल्हापूर अध्यक्ष एम. एन. काझी सांगली जिल्हा उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र बर्डे , शहाजीराव जाधव, प्रमोद लाड इ. कार्यरत आहेत. शरद काळे यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम मुंबईत असलेने ते ऑनलाईनवर संबोधीत करणार आहेत.
सिक्कीमचे माजी राज्यपाल सांसद श्रीनिवास पाटील यांना निमंत्रित केले आहे. चर्चा सत्राने पुढील कृती कार्याची रूपरेषा ठरवून सकाळच्या सूत्राचा समारोप। दुपारचे सत्र इंटिग्रेटेड सोशल मीडिया प्रोफेशनल चेअरमन चंद्रशेखर राव यांचे नेतृत्वाखाली आयोजित केले आहे. दुसरे दिवशी दि. 11जानेवारी 2024 रोजी कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष एम. एन. काझी यांचे नेतृत्वाखाली सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी व कोल्हापूर येथे स्वातंत्र्य वीर निजामुद्दीन काझी सद्भावना केंद्रातर्फे पुरस्कार वितरण सोहळा। रात्री शांतिनिकेतन सांगली येथे पुनरागमन. तिसरे दिवशी दि. 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी भव्य कृषी प्रदर्शनाचे उद् घाटन। व दुपारी अधिवेशनार्थींना निरोप. सदर अधिवेशनास आचार्य विनोबा भावे यांच्या मानस कन्या ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या पद्मविभूषण कै. निर्मलाताई देशपांडे यांच्या संस्थांचे प्रतिनिधी, खुदाई खिदमतगार, इ. विविध संस्थांच्या कार्यकर्यांना निमंत्रीत केले आहे। या अधिवेशनास सर्व क्षेत्रातील सक्रीय कार्यकर्त्यांनी हजर राहून ह्या रचनात्मक व राष्ट्रीय चळवळ उभारणे कामी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे।

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.