ताज्या घडामोडी

माळशिरस तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा.

माळशिरस तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 03/01/2024 :
तहसील कार्यालय माळशिरस,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने आज ग्राहक दिन साजरा करणेत आला.
यावेळी निवासी नायब तहसीलदार अमोल कदम हे अध्यक्षस्थानी होते.वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्यावी तसेच ग्राहक कायदा 1986 बाबत अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केले.या वेळी बोलताना ग्राहकांचे अधिकार व हक्क याबाबत त्यांनी माहिती दिली.
यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष उपेंद्र केसकर यांनी consumer protection in the era of e commerce and digital trade या विषयी मार्गदर्शन केले. ग्राहक कायदा 2019 हे ग्राहकाचे कवच कुंडल आहे याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले देशातील ग्राहक चळवळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना, कार्यपद्धती, 2019 कायद्यातील तरतुदी या बाबत त्यांनी भाष्य केले तसेच तालुक्यात चालू असलेल्या ग्राहक प्रबोधनाची माहिती दिली.उपस्थितांना ग्राहक चळवळीत सहभागी होणेचे त्यांनी आवाहन केले.
लोकशाही दिन सुरू करणेबाबत लेखी निवेदन देण्यात आले.
निमंत्रण देऊनही इतर शासकीय अधिकाऱ्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे श्रीकांत बाविस्कर यांनी महावितरण cgrs संबंधी मार्गदर्शन केले.या वेळी दत्तात्रय थोरात,अमित पुंज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन महादेव भोसले यांनी केले.या कार्यक्रमासाठी पुरवठा निरीक्षक सुशांत केमकर, दशरथ जरग, सुप्रिया वजाळे अखंड, आमीर तांबोळी, आकाश कदम, अजर मणेरी, बाळासाहेब झंजे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी वामनराव वाघमोडे, हारून शेख, स्वप्नील राऊत, संजय हुलगे, तानाजी वाघमोडे, सिद,दस्तगीर मुलाणी,भगवान घुगरदरे, ऋषिकेश थोरात तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.