सावित्रीबाई फुले यांनी भारतीय महिला सबलीकरणाचे कार्य केले : श्रीकांत राऊत

सावित्रीबाई फुले यांनी भारतीय महिला सबलीकरणाचे कार्य केले : श्रीकांत राऊत
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/01/2024 : सावित्रीबाई फुले यांनी भारतीय महिला सबलीकरणाचे कार्य केले.असे विचार मुख्याध्यापक श्रीकांत राऊत यांनी व्यक्त केले.
माळशिरस तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा,रावबहाद्दूर गट ( बिजवडी ) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा आढावा घेताना ते बोलत होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या एक थोर भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि पहिल्या शिक्षका होत्या. त्यांनी भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच महिला व मुलींना शिक्षण देण्याचे काम केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समवेत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्याची जाणीव येणाऱ्या सर्व पिढीला होणे गरजेचे आहे असेही मुख्याध्यापक श्रीकांत राऊत यांनी शेवटी म्हटले.
बालिका दिनानिमित्त शाळेमध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा, तीन पायांची शर्यत अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यानिमित्ताने उद्योजक योगेश गांधी यांनी मुलांना तीन डझन वह्या दिल्या.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. दिपाली लोखंडे, रोहिणी बंडलकर, वंदना भजनावळे, अश्विनी गरुड, मालन जगताप व शिक्षणप्रेमी महिला उपस्थित होत्या. बिजवडी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या वतीने मुलांना वडापाव व जिलेबीचे वाटप करण्यात आले. सहशिक्षक अजमीर फकीर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.