ताज्या घडामोडी

“ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भाकरीसाठी पराकाष्टा करणारा आपला माणूस धैर्यशिल मोहिते पाटील”

“ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भाकरीसाठी पराकाष्टा करणारा आपला माणूस धैर्यशिल मोहिते पाटील”

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 04/01/2024 :
“महाराष्ट्रातील समस्त
ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुखाची भाकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा आपला माणूस धैर्यशील मोहिते पाटील” असे मत गिरीश दाभाडकर (समन्वयक ग्रामपंचायत कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य) यांनी या प्रस्तुत लेखामध्ये व्यक्त केले आहे. माढा लोकसभा मतदार संघात सध्या सर्वत्र विशेष करून युवा वर्गामध्ये
“आपला माणूस आपला खासदार”… या सदरी एका कर्तबगार युवा नेतृत्वाबद्दल सातत्याने चर्चा झडत आहेत. प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, आणि सोशल मीडियामध्ये या संदर्भात सातत्याने आपापल्या परीने विचार व्यक्त होत आहेत त्यानुसारच वरील प्रमाणे प्रस्तूत लेखांमध्ये मत व्यक्त झालेले आहे.
११ जानेवारी २००५ मंत्री दालनात ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे संपूर्ण राज्यातून ५० एक प्रतिनिधी त्यांच्या समवेत नेतृत्त्व करणारा एक युवक म्हणत असतो, “सर्वांना बरोबर घेवून जात राहू, आपला प्रश्न महत्त्वाचा आहे आपण सर्वजण गेली २४ व्या वर्षापासून या प्रश्नाला सामोरे जात आहात.” चर्चा सपंते मार्ग काही निघत नाही.
पुढे ४ फेब्रुवारी २००५ वेळ दु २ वाजताची. पुन्हा हा पोरसवदा उमदा तरुण लोकांपुढे भव्य प्रमाणात धीरगंभीरपणे मुद्देसुद विषयाची मांडणी करीत असतो. समोर चांद्यापासून बांद्यापर्यंत बसलेल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कामगार आणि उत्सुकतेने जमलेले कर्मचारी कान टवकारून ऐकत असतात, एका चिरतरुण युवकाने ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची ईत्यंभूत माहिती माडलेली असते आणि तो युवक म्हणजेच धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील. व्यासपीठावर त्यांचे मोठे काका माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून कान टवकारूनत ऐकत असतात. भाषणात ते म्हणतात की, “माझा पुतण्या संघटनेचा अध्यक्ष आणि मी ग्राम विकास खात्याचे मंत्री म्हणून आपण मागण्या करीत असाल तर फक्त काळाच्या कसोटीला उतरणाऱ्यात मागण्याचाच विचार होईल, पण तुमच्या मागण्याचा सकारात्मक विचार करण्यात येईल”.
कार्यक्रम संपतो. आपल्या हाती काहीच पडले नाही अशी मानसिकता सर्व कर्मचारी बंधूंची होते पण धैर्यशिल मोहिते पाटील म्हणतात आपण या मागणीचा पाठपुरावा करीत राहुयात. हार नका मानू. आपल्या मागण्या योग्यच आहेत. सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतात. अवघ्या काही वर्षाचा हा तरुण धैर्यशील मोहिते पाटील सर्वांना आस्वासित करीत असतो सतत प्रयत्नशील राहतो आणि त्यांचे मुळेच ४ मार्च २००५ ला महाराष्ट्र शासन जि. आर. काढते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कामगारांना जिल्हा परिषद नोकरीमध्ये मध्ये आरक्षण मिळते. छ
ग्रामपंचायत कर्मचारी युनियन युनियंनची गेल्या कित्येक वर्षातली मागणी पूर्ण झाली याचे सर्व श्रेय धैर्यशिल मोहिते पाटील यांनाच द्यावे लागेल. समस्त कामगारच्या दृष्टीने ही खूप मोठी घटना आहे. त्याची फळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायात कर्मचारी यांना मिळताना दिसत आहेत.
या कामामुळेच त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जकात पात्र अनुदान ग्रामपंचायत संघटना, अनेक क्रीडा संघटना, आदी संघटनांचे जनसमुहाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली.असा हा कृतीशील नेता मोहिते-पाटील खानदानाने सजविला आहे. मोहिते पाटील विचारवारीचे ते वारकरी आहेत. म्हणूनच महाराष्ट्राला त्यांच्या एका रूपाने खानदानी राजकीय विचार लाभला आहे. त्यांच्या कर्तृत्त्वाला आता साजेसे पद मिळायला पाहिजे. म्हणूनच ते खासदार झाले पाहिजेत. असा सूर जनमानसात सर्वत्र उमटत आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.