आ. गोपीचंद पडळकर आणि चप्पल फेक,,,,,,,,!
आ. गोपीचंद पडळकर आणि चप्पल फेक,,,,,,,,!
Akluj Vaibhav News Network. Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras ,District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 10/12/2023 :
काल दिनांक 9/12/2023 रोजी धनगर समाजाचे फायर ब्रँड नेते , धनगर आरक्षणाचा ” अखेरचा लढा ”
यातील आमचे सहकारी नेते आ. गोपीचंद पडळकर यांच्या वर आमच्या तालुक्याच्या नाजिक असलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात नाना काटे यांनी चालू केलेल्या दूध दर वाढी साठी चे मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी गेले असताना त्यांचे विरोधात मराठा समाजातील उपोषणकर्ते यांचे समर्थक घोळक्यातून पोलिसांनी संघर्ष नको म्हणून आ. पडळकर यांना घेऊन जात असताना पाठीमागून चप्पल फेक केली आणि त्याचा व्हिडिओ ही बनवला.
याचा अर्थ आत्ता मराठा जात ही पक्ष आणि संघटन हा भेद विसरून त्यांच्या मागणी साठी एकजूट करून उभी राहिलेली आहे.
मराठा समाजातील गरजवंत आणि सधन प्रस्थापित मराठा असा मानसिक व कृत्रिम भेद गैर मराठा समाजाने करून घेतलेला आहे. ही त्यांची रणनीती आहे. तसे नसते तर महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कुणबी नोंदी शोधत आहे , ज्या प्रकारे राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करण्याचा प्रयास करत आहे , आणि मराठा समाजाला येन केन प्रकारेण मागास वर्ग ठरवण्याचा शिकस्ती ने प्रयास करत आहेत , ते झाले नसते. समग्र राज्यकर्ता असलेला सधन मराठा वर्ग या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांच्या पाठीशी अर्थ सत्तेचे पाठबळ घेऊन उभा आहे तो समाज म्हणून
त्यांचे मौन असणे , पडद्यावर नसणे हे निवडणुकीच्या निमित्ताने आहे कारण ते जाणतात की संसदीय राजकारणात एक जातीय राजकारण कधी यश प्राप्त करून देत नाही. ओबीसी सह सर्व मागासवर्ग , आणि मुस्लिम अल्पसंख्यांक यांना ही ते फक्त त्यांच्या सत्ता कारणासाठी कुरुवाळत राहतात , आणि
आम्ही बहुजन मात्र त्यांना आमचे मित्र , हितचिंतक , उद्घारक नेता समजत राहतो.
गैर मराठा बहुजन समाजा साठी त्या शासनकर्ता कडून कोणत्याही योजनेसाठी पुरेसा निधी नसतो. त्यांच्या आर्थिक विकास महामंडळा ना तटपुंजा निधी असतो , त्यांच्या विद्यार्थ्या साठी स्कॉलरशिप द्यावयास त्यांच्या कडे पैसा नसतो , पण मराठा समाजा साठी शासनाच्या सर्व योजना , निधी यांचा समृद्धी महामार्ग कार्यरत असतो ,
आजवर बहुजन समाजाने या बाबी कडे फारसे डोळसपणे पाहिलेले नव्हते , त्याचा हा परिणाम आहे.
आ गोपीचंद पडळकर हे आमदार नव्हते. ते लढावू नेतृत्व म्हणून विकसित झाले होते. आणि अखेरच्या लढा चे समग्र लिखाण करण्याची जबाबदारी माझ्यावर होती.
आमच्या तालुक्यातील उत्तमराव जानकर यांच्या मुळे ही जबाबदारी माझ्यावर आली होती. या चळवळीच्या प्रवाहात “धुमस” नावाचा चित्रपट , गाणी , लिहिण्याचा प्रारंभ करण्या पूर्वी त्याचा ढाच्या तयार करण्यासाठी आम्ही महाबळेश्वर येथे ऍड धैर्यशील पाटील यांच्या कॉटेज वर 8 दिवस एकत्रित राहिलो होतो.
आणि तिथेच त्यांची अन् माझी जादा ओळख निर्माण झाली.
यातून मी खात्री ने सांगतो की , ते समग्र मराठा समाजाचा द्वेष करत नाहीत. पण ज्यांना सहकार सम्राट आणि राज्यकर्ता वर्ग म्हणतो याच वर्गाने समग्र महाराष्ट्राचे , बहुजनातील सर्व जाती मायक्रो ओबीसी चे आर्थिक , राजकीय शोषण केले आहे. त्यांचे लोकशाहीचे अधिकार हिरावून घेतलेले आहेत. आणि माणसे गुलाम बनवून ठेवली आहेत हे त्यांचे म्हणणे काल ही होते , आज ही आहे , आणि उद्या ही राहील.
ते पवार घराण्या विरोधात बोलताना दिसतात पण ते बोलणे प्रतीकात्मक आहे. शोषण व्यवस्थेच्या शिलेदारांचे सरदार किंवा राजे म्हणून ते पवार घराण्या कडे पाहतात.
म्हणूनच ना. अजित दादा पवार यांच्या भाजपा समवेत चे सरकार समवेत येऊन ही त्यांना आपण नेते म्हणून मानत नसल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते.
बहुजनांनी या कथित सम्राटांच्या वारसदार यांना ताईसाहेब , वहिनी साहेब , दादा साहेब , अण्णा साहेब म्हणणे बंद करावे अशी जाहीर भूमिका त्यांनी मांडली होती , आणि मला वाटते संसदीय राजकारणात अशी बिनधास्त भूमिका घेऊन थेट भिडणारे बहुजनांचे नेते म्हणून युवक वर्गातील ते एकमेव नेते असावेत.
आज ओबीसी आंदोलनाच्या निमित्ताने , देशव्यापी ओबीसी नेते म्हणून मा ना छगनराव भुजबळ यांच्या खांद्यावर जी जबाबदारी आलेली आहे ती निभावताना त्यांच्यातील योध्याला आज उभा देश पाहत आहे.
भुजबळ साहेब जाणतात की या आंदोलनाला संरक्षित करण्याचे काम शासनव्यवस्थेतील सत्ताधारी वर्ग करत आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने कोणताही पक्ष बहुसंख्यांना दुखावण्याच्या स्थितीत नाही. म्हणून कमी शिक्षित असलेल्या आणि कायद्याच्या तरतुदीचा कोणताही अभ्यास नसलेल्या चेहऱ्याला गरजवंत म्हणून उभा करून त्यांच्या आडून ही लढाई लढली जात आहे. त्या लढाईचे रणनितीकार पडद्या आड आहेत , जे उद्याच्या निवडणुकीची रणनीती निर्माण करत आहेत.
टोलेजंग सभा , जेसीबी च्ये रांगा , फुलांचा वर्षाव , ही सर्व प्रतीके त्यांचे नायक उभे करण्यासाठी खर्ची घातले जात आहेत. साध्या चेहऱ्या चे पुढे खानदानी गादी वरील वारसदार ही स्वागता साठी उभे आहेत , ज्यांच्या इशाऱ्या शिवाय अकलूज मध्ये झाडाचे एक पान ही हलत नाही , आणि हललेच तर फक्त त्या झाडाची फांदी च नाही तर समग्र झाड उपटून टाकण्याची तयारी केली जाते त्या अकलूज मध्ये “गरजवंत मराठा ” सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावरून कोणत्या घटकाचा पाठिंबा या लढाईस नाही ते सांगा ?
ज्या नगर जिल्ह्यात पिंप्री निर्मळ या गावी 500 उच्च वर्णीय समाजाचा जमाव नव बौद्ध समाजाच्या एक दोन घरावर चालून जातो , तुळशी तालुका पंढरपूर येथे फक्त त्या गटाला मतदान केले नाही म्हणून नाभिक समाजाचे घरावर हल्ला केला जातो , उपरी तालुका पंढरपूर येथे 32वर्षाच्या विलास क्षीरसागर या माळी समाजाच्या दोन्ही पायांनी अपंग असलेल्या मुलाला शासनाची प्रतीकात्मक तिरडी दहन कार्यक्रमात जळत्या चितेवर ढकलण्याचे कौर्य मराठा आंदोलकांचा जमाव करत असतानाचे चित्रण बाहेर आले असताना दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह झाडाला फास घेतल्याच्या स्थितीत सापडतो , ज्या मृतदेहाचे पाय जमिनीवर टेकलेले आहेत ,
याचा अर्थ हा जमाव आत्ता
विवेकहिन अश्या झुंड शाहीत रूपांतरित झालेला आहे. आम्ही म्हणेल तो कायदा , आम्ही चालवू ते राज्य ,, ही त्यांची भूमिका झाली आहे.
ना. एकनाथराव शिंदे यांच्या पक्षाला जन समर्थन हवे असल्याने त्यास सामाजिक मराठा आधार निर्मिती साठी मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी दिलेली सर्व प्रकारची सुट आणि सवलत आंदोलन कर्त्या चे धाडस वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे .
लोकशाहीतील कायद्याचे राज्य ही संकल्पना बाजूला पडून बहु सांख्याक एक गठ्ठा जाती समूहाची दादा गिरी सर्व समाज घटकावर थोपवली जात आहे .
लोकशाहीत सर्व व्यक्ती आणि घटकांना राजकीय समता असताना ही स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभे पर्यंत फक्त एकाच समाजाची सर्वंकष सत्ता दिसून येते , गैर मराठा बहुजना तील जे लोक आज सत्तेत आहेत यातील बहुतेक त्यांचे मर्जीचे वाहक आहेत , ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थेत इतर समाजातील तेच चेहरे प्रतिनिधी म्हणून निवडले जातात ज्यांचे तोंड नेहमीच बंद असते , जे कोणताही हिशोब त्यांना विचारत नाहीत , निधी कोठे गेला ? याची विचारणा करत नाहीत , ठराव एकमताने मंजूर म्हणून हात वर करणारे सदस्य त्यांना हवे असतात , लोकशाहीचे विडंबन गेली 75वर्ष समग्र देशाने पाहिलेले आहे ,
ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब , भुजबळ साहेब , प्रकाश अण्णा शेंडगे साहेब , लक्ष्मणराव गायकवाड , टी पी मुंडे , शब्बीर भाई अन्सारी , राजाराम पाटील , आ. गोपीचंद पडळकर यांच्या सारखी मोजकी माणसे आज बोलत आहेत ,
याचा परीघ हळू हळू विस्तारत आहे ,
आंबेडकर वादी समूह या पूर्वी बोलत होता , पण तो एकाकी होता . गावकुसां बाहेरील वैचारिक आंदोलन गावकुसात शिरता शिरत नव्हते , जाती व्यवस्थेचा पगडा च इतका जबरदस्त होता ,
पण या मराठा आरक्षण आंदोलनाने समग्र समाज ढवळून निघाला .
गाव कुसातील छोट्या जात समूहांना ही प्रकर्षणे जाणवले की आपले शोषण कर्ते कोण आहेत?
वैचारिक इतिहास अन्वेषण पाहता ही व्यवस्था रामायण कालखंडा पासून सुरू अस्तित्वात आली , ब्राम्हणी वर्ण व्यवस्थेने क्षत्रिय समाजाच्या हातात शस्त्रे आणि राज्य कारभार दिला , वर्णव्यवस्था चे रक्षण करण्याची जबाबदारी ही दिली
पण बदलत्या काळा नुसार ब्राम्हण वर्णाने स्वतः मध्ये परिवर्तन घडवून आणले , ती जातीय ताठरता स्वतः चे वर्तणुकीतून हद्दपार केली , छोट्या छोट्या सर्व जाती ना समवेत घेऊन सत्ता निर्मिती ची स्वप्न पाहिली , आणि त्याचे पूर्ती पर्यंत ही ते पोहचले ,
डॉ बाबासाहेब आंबेडकर ब्राम्हणेतर चळवळी पासून दूर का राहिले? याचे उत्तर देताना त्यांनी म्हणले आहे
माझा ब्राम्हणी इझम ला विरोध आहे , ब्राम्हणांना नाही ,,,
ब्रम्हण्यात्व हे कोणत्याही जाती धर्मातील व्यक्ती किंवा समूहात असू शकते ( ब्राम्हण्यत्व म्हणजे उच्च नीच मानण्याची , स्वतः ला सर्वश्रेष्ठ , तर इतरांना आपल्या पेक्षा कमी मानण्याची वृत्ती , (कमी दर्जाचे लायकी नसलेले) आम्ही राजे ,,,,,, ही वृत्ती
त्यांचे कडे वर पाहून बोलायचे नाही , डोळ्याला डोळे भिडवायचे नाहीत , ते खुर्ची वर असले तर खाली मुंडी घालून इतरांनी उभे राहायचे , जी दादा साहेब म्हणत त्यांचे प्रत्येक काम ऐकायचे अशी व्यक्ती त्यांच्या लेखी आदर्श कार्यकर्ता ,
ही गुलामी त्यांनी समाजावर लादली , फाटके असून ही नवबौध्द समाजाने त्यांचे शी टक्कर घेतली , म्हणून संसदीय राजकारणातला त्यांचा टक्का घसरला , त्यांच्या जागी इतर पर्याय स्वीकारले गेले पण आंबेडकरी समाजाने कधीही त्या प्रति त्यांची नाराजी व्यक्त केली नाही , ते ही आपलेच आहेत असेच मानले ,
आजचे घडीला ही नेहमी प्रमाणे ओबीसी समूहातील कांहीं लाचार स्वार्थी लोक हे परिवर्तन मोडीत काढून मराठा समाजाचे बाजूने उभे राहत आहेत , आंबेडकरी समूह तटस्थ आहे , पण परिवर्तन करायचे असेल तर युद्ध काळात शांत राहून चालत नाही ,
म्हणून ओबीसी आंदोलनाच्या पाठीशी सर्व सामर्थ्य निशी आंबेडकरी समूहाने उभे राहण्याची गरज आहे. ही एकता आत्ता मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
धनगर , वंजारी , साळी माळी आगरी , कोळी , वडार , सुतार , लोहार , अश्या विविध जाती समुहा समवेत नवबौध्द समाजाने नाळ जुळवून घेण्याची ही संधी आलेली आहे.
या एकजुटीतच सत्ता खेचण्याची ताकद आहे , सत्ता परिवर्तन अपेक्षित करता आले नाही तर जे हात आ. गोपीचंद पडळकर यांच्या वर चप्पल फेकू शकतात , जे हात ओबीसी समूहाच्या हॉटेल्स , घराना आगी लाऊ शकतात ते हात समग्र बहुजन समाजाला उध्वस्त करून गुलाम केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण सत्ता त्यांचीच , गुंड त्यांचेच , आणि हिंसक जमाव ही त्यांचाच. सैय्या कोतवाल तो डर कैसा भैय्या ,,,? हे थांबवायचे असेल तर वज्रमूठ निर्माण झालीच पाहिजे व ती गैर मराठा सर्व समूहाची झाली पाहिजे इतकेच. जय भीम, जय जोती, जय अहिल्यादेवी.
ऍड अविनाश टी काले , अकलूज
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक
तालुका , माळशिरस , जिल्हा सोलापूर मो 9960178213