सुळकी तुकाईचा मंदिर एक दुर्लक्षित पर्यटन स्थळ

सुळकी तुकाईचा मंदिर एक दुर्लक्षित पर्यटन स्थळ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
🔰संजय हुलगे
माळशिरस : सोलापूर सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर शंभू महादेवाच्या पर्वत रांगामध्ये जिल्ह्याच्या सर्वात उंच टेकडीवर नैसर्गिक ठेवा असलेले सुळकी तुकाईचा मंदिर हे पर्यटकापासून वंचित राहिले असून पर्यटनाच्या दृष्टीने याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातून व निसर्गप्रेमी मधून होत आहे.
माळशिरस तालुक्याच्या हद्दीत जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरवर समुद्र सपाटी पासून आठशे मीटर उंचीवर हे सुळकी तुकाईचा मंदिर वसले आहे. माळशिरस पासून १० किलोमीटर अंतरावर व सातारा लातूर महामार्गावर गारवाडपाटी पासून अवघ्या चार ते पाच कि.मी. अंतरावर आहे. सातारा लातूर मार्गावरून जाताना पश्चिमेकडे असलेले मंदिर प्रवाशांचे लक्ष वेधून घेते. या डोंगराच्या पायथ्याला जाण्यासाठी दोन-तीन ठिकाणाहून कच्चे रस्ते आहेत. गोरडवाडी, तरंगफळ व गारवाड या गावांच्या शिवेलगत आहे.
या डोंगरावर ५० ते ६० चौरस फुटाचे चौकोणी मंदिर असून या मंदिरात सुळकी तुकाई मूर्ती आहेत. या डोंगराच्या पायथ्याला नाले ओढे. तलाव आहेत. पावसाळ्यामध्ये हा डोंगर पायथ्या पासून शिखर पर्यंत गवताने आच्छादलेला असतो. हा हिरवागार परिसर निसर्गप्रेमीना व गिर्यारोहकाना आपले लक्ष वेधण्यास भाग पाडतो. या डोंगराच्या पायथ्या पर्यंत जायला कच्चे रस्ते आहेत.पर्यटकांना थांबण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. कणगी पौर्णिमेला या देवीची यात्रा असते . देवीच्या दर्शनासाठी या परिसरातील भाविकांची मोठी गर्दी असते. या डोंगराच्या दक्षिणेचा भाग (गारवाड) कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. तर उत्तर भागातील शेती क्षेत्र सिंचनाखाली आहे. या तीन ते चार किलोमीटरच्या अंतरामध्ये तफावत आहे. दुष्काळी भागामुळे हे पर्यटन स्थळ वंचीत राहिले असून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भवन निसर्गप्रेमीतून होत आहे. तालुका प्रतिनिधीनी लक्ष देण्याची गरज आहे.