मेंढ्या पळवण्याचा सोहळा संपन्न.

मेंढ्या पळवण्याचा सोहळा संपन्न.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
तरंगफळ प्रतिनिधी दिनांक 14/11/2023 : सोलापूर जिल्ह्यातील तरंगफळ (तालुका माळशिरस) येथे दिपवाळी पाडव्यानिमित्त मेंढ्या पळवण्याचा पारंपारिक सोहळा संपन्न झाला.
तरंगफळ येथे दिपवाळी पाडव्यानिमित्त गावातील मेंढपाळ बंधू आपल्या मेंढ्यांसह श्री मारुती मंदिर व पंचाच्या पाराला म्हणजेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून दिपवाळी पाडवा सण साजरा करतात.
यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा मेंढपाळ बांधव उत्साहात आणि शांततेत मेंढ्या पळवण्याचा कार्यक्रम पार पाडताना दिसले. माळशिरस तालुक्यातून व सोलापूर जिल्ह्यातून अनेक प्रेक्षक या सोहळ्यात सामील झाले होते. दिपवाळी पाडवा झाल्यानंतर सर्व मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन लातूर उस्मानाबाद बीड पर्यंत मेंढ्या घेऊन जातात त्यानंतर ते जून जुलै मध्ये पाऊस पडल्यानंतरच गावाकडे येतात अनेक संकटांना सामोरे जात दिपवाळी पाडवा उत्साहात साजरा करतात आपल्या मेंढ्यांना सजवून रंगवून या उत्सवात सामील करतात यावर्षी या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती.