ताज्या घडामोडी
घोडके 卐 चोरमले शुभविवाह संपन्न
घोडके 卐 चोरमले शुभविवाह संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 02/12/2025 :
निवृत्ती महादेव घोडके यांचे नातू व सौ सखुबाई व हनुमंत निवृत्ती घोडके (राहणार 61 फाटा, माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांचे चिरंजीव महादेव व चि.सौ. कां. रिया( कै. किसन निवृत्ती चोरमले यांची नात व सौ सुवर्णा व रामदास किसन चोरमले राहणार वकील वस्ती, तालुका इंदापूर जिल्हा पुणे) यांची सुकन्या यांचा शुभविवाह मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वा. 16 मि. या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.
कृष्णा मंगल कार्यालय नऊ चारी अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी अत्यंत थाटाने संपन्न झालेल्या या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून आप्तेष्ट, हितचिंतक, मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर इत्यादींनी नव वधूवरांना शुभाशीर्वाद दिले.
