युवकानो आरक्षणासाठी आत्महत्या करू नका : संजय वाघमोडे
कांडगांव ता. करवीर येथे शाखा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न

युवकानो आरक्षणासाठी आत्महत्या करू नका : संजय वाघमोडे
कांडगांव ता. करवीर येथे शाखा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 29/18/2023 :
धनगर आरक्षणाची लढाई आरक्षण मिळेपर्यंत आपण गावागावातून एकजूट करून निकाराने लढूया.परंतु आरक्षण मिळत नाही म्हणून निराश होऊन आपण आपले जीवन संपवू नका. आरक्षणासाठी जेव्हा आपल्या मनात आत्महत्येचा विचार येईल तेव्हा मित्रांनो आपल्याला मोठे करणारी आणि तुमच्याकडे म्हातारपणात आधार म्हणून पाहणाऱ्या वयस्क आई-वडिलांचा चेहरा नजरे पुढे आणा. आपल्याबरोबर लग्न करून आयुष्याची साथ देणारी पत्नी व मुलाबाळांचा चेहरा आठवा. आपण आत्महत्या केली तर आपल्या मुलांबाळांचं, पत्नीचे काय होईल? आईवडिलांचे काय होईल ? याचा विचार करा. आपण सर्वजण मिळून आरक्षणाची लढाई जोरदार लढूया ती आरक्षण मिळेपर्यंत. परंतु आत्महत्येसारखे टोकदार पाऊल उचलू नका. असे भावनिक आवाहन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केले. ते यशवंत क्रांती संघटनेच्या कांडगाव शाखा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाज बांधव केरबा भिवा हजारे हे होते.
इतिहास संशोधक प्रणय पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुनील शेळके, कोल्हापुर जिल्हा उपाध्यक्ष अमोल मेटकर, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख आप्पाजी मेटकर, केर्ली शाखाध्यक्ष दीपक माने, हेरवाडे, सुभाष हजारे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते बोलताना पुढे म्हणाले कि यशवंत क्रांती संघटनेमुळे युवक आपापसातील मतभेद विसरून गावागावात एकत्र येते आहेत. कांडगावमध्ये युवकांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन खरोखरच क्रांती घडवली.व यशवंत क्रांती संघटनेच्या शाखेची स्थापना केली. या सर्व युवकांच्या पाठीशी यशवंत क्रांती संघटना ठामपणे उभी आहे. एकजुटीबद्दल कांडगावमधील युवकांचे अभिनंदन.असेच यापुढील काळात एकजुटीने समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून एकजुट होत असेल तर संघटनाप्रमुख म्हणून मी समाधानी आहे.
कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून सचिन आनंदा लांडगे, करवीर तालुकाध्यक्षपदी निवास हजारे यांची तर शाखाध्यक्ष कृष्णात विठ्ठल लांडगे, शाखा उपाध्यक्ष दिपक बिरू गोरडे, खजिनदार अजित शशिकांत हजारे, इत्यादी पदाधिकारी यांना पद नियुक्ती पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास राधानगरी तालुका संपर्कप्रमुख रामचंद्र देवणे, पंडित माने, करवीर युवक तालुकाध्यक्ष अमोल सिसाळ, संपर्कप्रमुख, अंबप उपाध्यक्ष मारुती माने, टोप शाखाध्यक्ष काशिनाथ सिसाळ, अंबप शाखाध्यक्ष शिवाजी हिरवे, सागर माने, शिये शाखा संकेत रानगे, शाखा उपाध्यक्ष सचिन वाघमोडे, सघंटक जगन्नाथ माने, केर्ली शाखा उपाध्यक्ष, बाबुराव माने केर्ली शाखा संपर्कप्रमुख बाळू माने, शाखा सचिव सागर माने आणि बाबासो माने इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष हजारे यांनी केले तर आभार कृष्णा गोविंद हजारे यांनी मानले.
शाखा सदस्य तानाजी लाडगे, बाजीराव लाडगे, सदिप लाडगे, राहूल लाडगे, कृष्णात वाघमोडे, बिरू वाघमोडे, बाबासो लाडगे, सर्जेराव लांडगे, प्रसाद हजारे, सुभाष हजारे, आदित्य वाघमोडे, दत्ता लाडगे, देवदास हजारे, बिरू हजारे, सागर लाडगे, राहूल लाडगे, विशाल वाघमोडे, कृष्णात वाघमोडे, बिरू वाघमोडे, साताप्पा हजारे, मनोज हजारे, कृष्णात हजारे, विठ्ठल लाडगे, यशवंत लाडगे, सुभाष लाडगे, बिरू गोरडे, कामन्ना हेरवाडे, आप्पाजी लाडगे, अविनाश लाडगे, यशवंत लाडगे, गोविंद हजारे, खानु लाडगे, बाळू हजारे, नंदू लाडगे, रणजीत लाडगे, संजय लाडगे, सम्राट लाडगे, पाडू लाडगे, सोहम लाडगे, संकेत लाडगे, विक्रम वाघमोडे, उदय लाडगे, माया लाडगे, सुनिता लाडगे, येसुबाई लाडगे, सरिता लाडगे, अलका हजारे, पुजा हजारे, चेदाबाई लाडगे, मालुबाई गोरडे, आक्कताई लाडगे, कामाबाई लाडगे, अनुराधा लाडगे, सुजाता हजारे, अनुबाई लाडगे, सगिता वाघमोडे, बनुताई हजारे, जानवी लाडगे, स्वप्नाली लाडगे, सोनाली गोरडे छाया लाडगे, तसेच ग्रामस्थ, समाजबांधव मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.