शहीद निवृत्ती जाधव स्मृतिदिनानिमित्त श्रीपूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

शहीद निवृत्ती जाधव स्मृतिदिनानिमित्त श्रीपूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/10/2023 : केंद्रीय राखीव पोलीस फोर्स मधील पोलीस इन्स्पेक्टर शहीद निवृत्ती जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7:45 वाजता शहीद निवृत्ती जाधव स्मारक स्थळी, शहीद जवान ज्योतीचे पूजन करून रॅलीचा प्रारंभ होईल. रॅलीमध्ये श्री चंद्रशेखर विद्यालया तील विद्यार्थी व परिसरातील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
त्यानंतर सकाळी 9:30 वा. स्मारक स्थळी सलामी देऊन श्रद्धांजली वाहण्यात येईल. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण, पुरस्कार वितरण, मनोगतं व्यक्त करण्यात येणार आहेत.
स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह बबनराव शिंदे, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, पीएसआय स्वाती नितीनकुमार सुरवसे, ब्रिमा सागर महा. डिस्टलरी मॅनेजर दिनकरराव बेंबळकर, महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण, हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, कामधेनु संस्थेचे संस्थापक डॉ. लक्ष्मण आसबे, आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉ. रामदास देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्था महाळुंग – श्रीपूर, श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.