कविता विश्व.महाराष्ट्र

पत्रिका

कविता विश्व…. .‌…✍️

पत्रिका

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क.
संस्थापक संपादक : भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे.
संग्रामनगर – अकलूज.
तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र राज्य. मोबाईल नंबर 98 60 95 97 64.

अकलूज दिनांक 15/7/2023 :

पत्रिका

भारताने आपल्या पत्रिकेतला
चंद्र पाहिला जुळवून
शांतशितल चंद्राचे नाते परंपरेनेच आले जुळून

आँप्टिमिस्टिक संस्कार
आणि प्रयत्नशील विज्ञान
दोघांची गट्टी जमल्यावर
दूर पळाल सारं अज्ञान

अग्नीपिसारा फुललेला
आकाशात झेपावला
उतुंग वैज्ञानिक शोधाने
भारतवाशी हेलावला

विज्ञानाच्या हरएक कृतीला
पंतप्रधानांची होती पृष्टी
सरकारने दिली साथ तर
जगाकडून होईल पुष्पवृष्टी

आजपर्यंत भारत देश
नकाशा वरच होता
अंधश्रद्धा परंपरेच्या तो
चक्रव्यूहात फसला होता

गती मिळाली संशोधकतेला
विज्ञानाच्या परिश्रमाला
चंद्रही झाला अचंबित अन
उभा आहे स्वागताला

———————————-
————————————

पाऊस गाणे

हिरवे हिरवे
रान चहुकडे
ओलेता वारा ही भुलला

उनाड होऊन
विहरत विहरत
पानफुलांना चुंबीत सुटला

तार सरीवर
किरण घसरले
धरतीच्या ओल्या अंकावर

इवले इवले
कोंबांचे करतल
टाळ्यापाटिते बघ वा-यावर

अलगद बसले
थेंबाचे मोती
हिऱ्या सारखे चमचमलेपण

पाऊस भिजूनी
चिंब नाचला
सृष्टीचे पाहूनी बालपण

®©प्रा.सौ.मानसी मोहन जोशी. ठाणे प.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.