कविता विश्व.महाराष्ट्र
चांद्रयान..🚀

कविता विश्व………..✍️
चांद्रयान..🚀
Akluj Vaibhav News Network Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
झेपावलं चांद्रयान,
उंचावला स्वाभिमान..
अभिमानानं गेली वर,
आम्हा भारतीयांची मान !
मुखड्याला म्हणत होतो,
आम्ही ‘चाँद का तुकडा’..
चंद्र आहे साक्षीला,
वाढला कवितांचाच आकडा !
शास्त्रज्ञांनी मात्र आमच्या,
वाढवली संशोधनाची गती..
अंतराळात सोडले उपग्रह,
साधली वैज्ञानिक प्रगती !
कुंडलीतील मंगळ कुंडीत,
गाडून पाठवले मंगळयान..
आता चंद्रावरच अधिराज्य,
करणार आमचे चांद्रयान !!
राजेंद्र काळे (Rajendra Kale)
बुलडाणा (Buldhana) ९८२२५९३९२३