सुवर्णकन्या: माळशिरसची ॠतुजा भोसले

सुवर्णकन्या: माळशिरसची ॠतुजा भोसले
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 02/10/2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव केला. भारतीय जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी शानदार पुनरागमन करत अखेर सुपर टाय ब्रेकमध्ये सामना जिंकला. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीला पहिल्या सेटमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांना तैपेई जोडीने ६-२ ने पराभूत केले. यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत तैपेईच्या अन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा १०-४ असा पराभव करत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. त्यानंतर दोघांमधील निर्णय सुपर टाय ब्रेकमध्ये घेण्यात आला, ज्यामध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीत १०-४ असा शानदार स्कोअर करून इतिहास रचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.
राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आणि नगर ग्रामीण चे डीवायएसपी (DYSP) संपतराव भोसले (मुळगाव मु.पो.लवंग ता.माळशिरस जि.सोलापूर, सध्या राहणार पुणे बाणेर) यांचे व त्यांची सुवर्णकन्या ऋतुजा भोसले यांचे वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.