भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट ची शिवानी राऊत तालुक्यात प्रथम, अनिकेत सरवदे व सौरभ भरते द्वितीय तर अरबाज शेख तृतीय

भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट ची शिवानी राऊत तालुक्यात प्रथम, अनिकेत सरवदे व सौरभ भरते द्वितीय तर अरबाज शेख तृतीय
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 22/9/2023 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने जुलै ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी टीबीसी परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत उज्वल यश प्राप्त केले आहे.
या परीक्षेमध्ये संस्थेतील कु शिवानी महालिंग राऊत हिने मराठी 30 श.प्र.मि. या विषयात 92.50% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
अनिकेत रामलिंग सरवदे याने याच विषयात व
सौरभ अजय भरते याने इंग्रजी 30 श.प.मि. या विषयात 92% गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केला.
शेख अरबाज शरपुद्दीन याने 91% गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळविला.
भक्ती संस्थेच्या विद्यार्थ्यांनी संस्थेची मागील परंपरा कायम ठेवत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. जीसीसी-टीबीसी जुलै ऑगस्ट 2023 परीक्षेत विषयानुसार संस्थेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :-
जीसीसी-टीबीसी मराठी 30 श.प्र.मि. या विषयात:- शिवानी महालिंग राऊत 92.50% प्रथम, सरवदे अनिकेत रामलिंग 92% द्वितीय, शेख अजबाज शरपुद्दीन 91% तृतीय.
इंग्रजी 30 श.प्र.मि. या विषयात :- भरते सौरभ अजय 92% प्रथम, गायकवाड साकेत जगदीश 90.50% द्वितीय, जावेद हरून मुलाणी 89% तृतीय.
इंग्रजी 40 श.प्र.मि. या विषयात :- कुबेर प्रशांत गायकवाड 89% प्रथम, स्वप्निल चंद्रकांत कर्चे 84.50% द्वितीय, गणेश सदाशिव चव्हाण 82.50% तृतीय.
तर या परीक्षेतील प्रश्न विभाग दोन मध्ये नामदेव शिवाजी गुरव, जावेद हरुन मुलाणी, कुबेर प्रशांत गायकवाड, अनिल भारत माळी यांनी 30 पैकी 30 गुण प्राप्त केले तर विभाग तीन मध्ये सौरभ अजय भरते, शरद बाबासाहेब पाटील यांनी 20 पैकी 20 गुण मिळवत या सर्वांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ, नितीन दुरणे, किरण भगत, संचिता नेटके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. उज्वल यश प्राप्त केलेल्या तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून संस्थेच्या वतीने प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.