ताज्या घडामोडी

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात सामंजस्य करार व इंडक्शन प्रोग्राम संपन्न

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात सामंजस्य करार व इंडक्शन प्रोग्राम संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 22/9/2023 : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर -अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि.२२/०९/२०२३ रोजी इन्स्टिटयूट आणि टेस्टबुक एज्यु. सोल्यु. प्रा. लि . नवी मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार इंडक्शन प्रोग्राम संपन्न झाला. यावेळी टेस्टबुक एज्यु. सोल्यु. प्रा. लि . नवी मुंबई चे महाविद्यालयीन समन्वयक मंगेश कोल्हे, पारिजात कुलकर्णी , कु. निकिता बडोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सचिन पांढरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.
यावेळी टेस्टबुक एज्यु. सोल्यु. प्रा. लि . नवी मुंबई चे महाविद्यालयीन समन्वयक मंगेश कोल्हे यांनी विध्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी इंडक्शन प्रोग्राम चा फायदा मुलांच्या प्लेसमेंट साठी होईल व उद्योजकता विकास याबाबतची कार्यशाळा लवकरच घेण्यात येईल अशी माहिती दिली.

या कार्यक्रमामध्ये श्री. पारिजात कुलकर्णी व कु. निकिता बडोदे यांनी मुलांना कॅम्पस इंटरव्ह्यूव टेक्निक , ऍप्टिट्यूड टेस्ट आणि ग्रुप डिस्कशन संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. राजेश्वर पोटे व प्रा. रुपाली शिंदे-सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

Share

Chief Editor

Akluj Vaibhav News Network. Chief Editor Bhagywant Laxman Naykude. Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State India. Mo. 9860959764.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.