ताज्या घडामोडी

माढा विधानसभा मतदारसंघासाठी आदिवासी विकास योजनेअंतर्गत 6 कोटी 6 लाखांच्या निधीची आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

माढा विधानसभा मतदारसंघासाठी आदिवासी विकास योजनेअंतर्गत 6 कोटी 6 लाखांच्या निधीची आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मागणी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 22/9/2023 :
माढा विधानसभा मतदार संघातील 39 गावांतील विविध विकासकामांसाठी आदिवासी विकास योजनेतून तब्बल 6 कोटी 6 लाख रूपयांच्या निधीची मागणी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
माढा विधानसभा मतदार संघामध्ये माढा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यांचा समावेश असून या तालुक्यातील 39 गावांमध्ये रस्ते, गटारी, पारधी समाज मंदिर बंधणे, पारधी वस्ती सुशोभिकरण अशा विविध विकासकामांसाठी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली आहे.
मागणीकरण्यात आलेल्या गावांमध्ये माढा तालुक्यातील आलेगांव बु. (2), रूई, खैराव (5), रोपळे (खु.) (2), जाधववाडी, वडाचीवाडी, बेंबळे (3), माढा, पंढरपूर तालुक्यातील सांगवी बादलकोट (8), देवडे (2),करकंब (2), माळशिरस तालुक्यातील वाफेगांव, लवंग (2),वाघोली (3), जांबूड, माळखांबी, बोरगांव, माळेवाडी (बो) या गावांचा समावेश आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.