ताज्या घडामोडी

ज्येष्ठा गौरींसह विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आगमन

ज्येष्ठा गौरींसह विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आगमन

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 22/9/2023 : नायकुडे वस्ती, मायाक्का कॉलनी, (संग्रामनगर – अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य) येथे ज्येष्ठा गौरींसह विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे, सर्व ज्येष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचे “द्रौपदी-लक्ष्मण” निवासस्थानी मंगलमय वातावरणात आगमन झाले. येथील महिला वर्गांच्या उपस्थितीमध्ये सौ. रचना भाग्यवंत नायकुडे, सौ. निकिता आकाश नायकुडे, सौ. चैत्राली विक्रम काकडे यांनी त्यांच्या आगमनाची जयंत तयारी केली.


शुक्रवार दिनांक 22 रोजी सकाळी श्री गणेश मूर्ती, ज्येष्ठा गौरी मूर्ती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करून भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे व सौ. रचना भाग्यवंत नायकुडे उभयतांच्या हस्ते आरती घेण्यात आली.
वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन राष्ट्रीय सल्लागार समिती ज्येष्ठ सदस्य भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या साक्षीने “दररोज एक रुपया धनगर समाजासाठी” या संकल्पनेचा शुभारंभ प्रत्यक्ष कृतीद्वारे केला आहे.

साप्ताहिक स्वाभिमान दिन

धनगर बांधवांनी “साप्ताहिक स्वाभिमान दिन” दर रविवारी आपले घरी साजरा करावा. आठवड्यातून दर रविवारी सकाळी सात वाजता आपापले घरी विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे. त्याचबरोबर प्रत्येकांनी दररोज कमीत कमी एक रुपया समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बचत करून राखून ठेवावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज एक रुपया स्कॅनर च्या माध्यमातून पाठवावा.


जमा होणाऱ्या रकमेतून वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अति भव्य आणि सुसज्य असे चारिटेबल हॉस्पिटल उभारणार आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये सर्व धर्मीयांसाठी फक्त आणि फक्त एक रुपया नाममात्र फी मध्ये सर्व आरोग्य उपचार तज्ञ डॉक्टरांच्या टीम द्वारे करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्मातील दानशूर नागरिक स्वेच्छेने या “दररोज एक रुपया” मोहिमेमध्ये सहभागी होतील. वर्षातील 365 दिवसांचे 365 रुपये सर्वसामान्यातील सामान्य सुद्धा देऊ शकेल. असा विश्वास या निमित्ताने अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता आणि akluj vaibhav.in चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी व्यक्त केला. तसेच येत्या नवीन वर्षात 4 फेब्रुवारी 2024 रोजी रेल्वे ग्राउंड बारामती येथे पहिला जागतिक स्वाभिमान दिन आयोजित करण्यात येणार आहे. असे वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे यांनी जाहीर केले आहे. या पहिल्या जागतिक स्वाभिमान दिनाच्या निमित्ताने नियोजित स्थळी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही शेवटी त्यांनी केले आहे.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.