आपला जिल्हा

🟣माढा विधानसभा मतदारसंघातील गावांना २५१५ चा ३ कोटी रूपयांचा निधी मिळणार 🟠आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

🟣माढा विधानसभा मतदारसंघातील गावांना २५१५ चा ३ कोटी रूपयांचा निधी मिळणार

🟠आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 01/09/2023 : आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माढा विधानसभा मतदारसंघात रस्ते विकासाकरिता २५१५ मधून ३ कोटीचा निधी मिळावा म्हणून मागणी केली.
फडणवीस यांनी मतदारसंघातील प्रस्तावित कामांना तात्काल स्वरूपात कारवाई करावी म्हणून संबधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या असल्याचे आ.मोहिते-पाटील यानीं सांगितले.
माढा विधानसभा मतदारसंघात माढा माळशिरस पंढरपूर तालुक्यातील काही गावाचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागे, नांदोरे, पटवर्धन कुरोली, देवडे भोसे, व्होळे, शेवते, खेडभोसे, नेमतवाडी,शेगाव दुमाला, भटुंबरे,भैरवनाथवाडी, सांगवी बादलकोट,आव्हे, चिलाईवाडी माळशिरस तालुक्यातील खळवे, विठ्ठलवाडी, जांभूड उंबरे(वे), माढा तालुक्यातील चव्हाणवाडी(टें), लोंढेवाडी, उपळाई खुर्द, उजनी(मा) वरवडे, मोडनिंब, आलेगाव खुर्द मानेगाव, जाधववाडी, आहेरगाव, लऊळ, उपळाई (बु), खैरेवाडी, टाकळी, आलेगाव(बु), बैरागवाडी, रणदिवेवाडी, आढेगाव, वडशिंगे, चिंचोली, पालवन, उंदरगाव, केवड वेणेगाव या माढा विधानसभा मतदारसंघात समावेश असणाऱ्या गावात २५१५ योजनेंतर्गत रस्ते विकास व्हावा या करीता ३ कोटी रूपयांची मागणी केली असल्याची आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.