आपला जिल्हाक्राईम

⭕पूर्व वैमनस्यातून गणेश सदाशिव भोसलेंवर प्राणघातक हल्ला. 🟣अकलूज पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

⭕पूर्व वैमनस्यातून गणेश सदाशिव भोसलेंवर प्राणघातक हल्ला.

🟣अकलूज पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 25/8/2023 : पूर्व वैमनस्यातून कोयत्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या संग्रामनगर येथील 40 वर्षीय गणेश सदाशिव भोसले यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
गुरुवार दिनांक 24/8/2023 रोजी रात्री 9:30 च्या सुमारास ही घटना घडली. अशोका चौकातून संग्रामनगर मधील रत्नपुरी 18 येथील आपल्या घराकडे जात असताना रत्नपुरी ८ ओलांडून पाठीमागून मोटरसायकल वरून आलेल्या तीन जणांनी गणेश भोसले यास थांबविले.त्यावेळी रस्त्यावरील दिवाबत्तीत व मोटार सायकलच्या दिवाबत्ती उजेडामध्ये पाहिले असता त्यापैकी एक इसम ओळखीचा व दोन अनोळखी व्यक्ती असल्याचे गणेश भोसले यांनी पाहिले.
त्यापैकी एकाने, तु नाना आसबे खून केस मध्ये लय मस्ती करतोय, कोर्टात जातोय, माझ्या वडिलांना जामीन होऊ देत नाही, थांब तुला आता जिवंत सोडत नाही.असे म्हणून त्या इसमानी त्यांच्या हातातील कोयत्याने गणेश भोसले यांच्या डोक्यावर, हातावर, तोंडावर व पायावर ,सपा सप वार करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना गंभीर जखमी केले. अशा आशयाची फिर्याद अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 610/2023 भारतीय दंड विधान कलम307, 120 ब ,341, 34 प्रमाणे दाखल झाली आहे. याप्रकरणी
१)प्रवीण उर्फ पंप्पू भोसले २)अतुल उर्फ पिंटू मोहिते ३)साजिद इब्राहिम सय्यद ४)आदित्य मोहिते ५)नितीन एकतपुरे ६)अतुल उर्फ भैया इंगळे ७) नागेश उर्फ गोपी इंगळे ८)रोहित राजू भोसले, सर्व राहणार अकलूज ,तालुका माळशिरस ,व आणखी २ अनोळखी इसमांसह अशा दहा जणांवर अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दाखल अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी तर तपासी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे आहेत.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.