आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीप्रेरकमहाराष्ट्र

प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेत नांदोरे चा संघ विजेता


प्रताप क्रीडा मंडळाच्या आट्यापाट्या स्पर्धेत नांदोरे चा संघ विजेता

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo.9860959764.

अकलूज दिनांक 21/8/2023 :
प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य आट्यापाट्या स्पर्धेत नांदुरे (तालुका पंढरपूर) येथिल
चंद्रकांत सत्रे संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांना प्रथम क्रमांकाचे रोख रुपये ४४ हजार व मानाचा चषक देण्यात आला. तर उपविजेता संघ जय बिरोबा संघ (ब) कचरेवाडी( तालुका माळशिरस) हा ठरला. त्यांना द्वितीय क्रमांकाचे रोख रुपये ३३ हजार बक्षीस देण्यात आले.
विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, दीपकराव खराडे पाटील, महादेव अंधारे, लक्ष्मण आसबे या मान्यवरांच्या हस्ते झाले.
स्पर्धेतील तृतीय क्रमांक जय हनुमान संघ ब, कवठाळी (तालुका पंढरपूर) यांना रोख रुपये २२हजार, चौथा क्रमांक पै. नितीन भाऊ घंटे संघ, शिरढोण (तालुका पंढरपूर) यांनी रोख रुपये ११ हजार बक्षीस देण्यात आले. उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या सुदर्शन आट्यापाट्या संघ, तीसंगी, छत्रपती संघ पेहे, ता. पंढरपूर, कासलिंग संघ धायटी, ता. सांगोला, शंकर आबा भुसनर संघ १५ सेक्शन, ता. माळशिरस या चार संघांना प्रत्येकी रोख रुपये पाच हजार बक्षीस देण्यात आले.
रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दोन मैदानावर सदरच्या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये एकूण ८० संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेदरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील या मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला.
अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, मागील वर्षी स्पर्धेमध्ये ४० संघाचा सहभाग होता. यावर्षी ८० संघाचा सहभाग आहे. स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
स्पर्धेचे समालोचन ए. एम. अडसूळ, बापूसाहेब लोकरे यांनी तर सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, पोपट पवार, जाकीर सय्यद, दत्तात्रय मगर यांनी केले. स्पर्धेतील ६४ पंचांचा, आरोग्य सेवकांचा, सुरक्षा रक्षकांचा मंडळाचे वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास मंडळाचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, खजिनदार वसंतराव जाधव, स्पर्धा प्रमुख यशवंत माने देशमुख, संचालक बिभिशन जाधव, राजेंद्र देवकर, रणजीत रणवरे, नंदकुमार गायकवाड, विश्वनाथ आवड यांच्यासह सर्व सदस्य, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.