श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांचा “दुर्गाशक्ती” पुरस्काराने गौरव

श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांचा
“दुर्गाशक्ती” पुरस्काराने गौरव
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo.9860959764.
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुबई दिनांक 8/11/2023 : महाराष्ट्र शासनाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” पुरस्काराने सन्मानित केलेल्या श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांचा उद्या सोलापुर येथे “दुर्गाशक्ती” पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तरुण भारत संवाद मीडिया परिवाराच्यावतीने दिला जाणारा हा 2023 चा पुरस्कार तरंगफळ ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांना जाहीर झाला. त्याचे वितरण उद्या(दि.10) दुपारी तीन वाजता सोलापूर या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. त्यांनी सामाजिक, राजकीय, दिव्यांग क्षेत्रात विविध समाज उपयोगी कार्य केल्याबद्दल त्यांना मिळत असलेल्या पुरस्कार बद्दल तरंगफळ ग्रामस्थ तरंगफळ ग्रामपंचायत बरोबरच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“वार्धक्यातही आपल्या उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आमच्या पाहुण्या श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांना 2023 चादुर्गाशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याबद्दल त्याचे आणि सर्व क्षेत्रांतील अबाल वृद्धांच्या उल्लेखनीय कार्याची वेळीच दखल घेऊन त्यांना सन्मानित करून प्रोत्साहित करणाऱ्या “तरुण भारत संवाद मीडिया परिवाराचे माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ, साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता, akluj vaibhav.in या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा देत आहे” :- संस्थापक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे.